आर्यन खानला जामीन, किरण गोसावी अडकला, पुणे कोर्टाकडून गोसावीला पोलीस कोठडी

मुंबई तक

आर्यन खानवर कारवाई झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB चा साक्षीदार किरण गोसावीला पुणे कोर्टाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. किरण गोसावीवर पुण्यातील एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल आहे. आर्यन खान प्रकरणात किरण गोसावीचा सेल्फी समोर आल्यानंतर पुणे पोलीस त्याच्या शोधात होते. गोसावीने स्वतःला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधिन केल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने त्याला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

आर्यन खानवर कारवाई झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB चा साक्षीदार किरण गोसावीला पुणे कोर्टाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. किरण गोसावीवर पुण्यातील एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल आहे. आर्यन खान प्रकरणात किरण गोसावीचा सेल्फी समोर आल्यानंतर पुणे पोलीस त्याच्या शोधात होते.

गोसावीने स्वतःला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधिन केल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेत कारवाई केली आहे.

आर्यन खानची दिवाळी ‘मन्नत’वर; बॉम्बे हायकोर्टाने केला जामीन मंजूर

किरण गोसावीला पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमधून कोर्टासमोर हजर करण्यात आलं. किरण गोसावी हा आर्यन खानच्या अटकेनंतर काही दिवस गायब झाला होता. पुणे पोलिसांनी कोर्टाकडे गोसावीची १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली. तक्रारदार चिन्मय देशमुख या तरुणाकडून घेतलेल्या पैशांचा तपास करण्यासाठी पोलिसांना किरण गोसावीच्या बँक खात्याची चौकशी करावी लागणार आहे.

हे वाचलं का?