पुणे: TC चे कपडे, आयकार्ड दाखवून रेल्वेत नोकरी लावण्याचं आमिष, 2 सराईत महिला गजाआड
समीर शेख, पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या निगडी पोलिसांनी 2 अशा महिलांना अटक केली आहे ज्या रेल्वे विभागात नोकरी लावण्याचे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करत असे. या महिलांच्या विरोधात निगडी परिसरात राहणाऱ्या सुमित्रा सुशील घुले या 32 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. या गुन्ह्याबाबत अधिक माहिती देत असताना पिंपरी-चिंचवड शहराचे उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखो रुपयांना […]
ADVERTISEMENT

समीर शेख, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवडच्या निगडी पोलिसांनी 2 अशा महिलांना अटक केली आहे ज्या रेल्वे विभागात नोकरी लावण्याचे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करत असे. या महिलांच्या विरोधात निगडी परिसरात राहणाऱ्या सुमित्रा सुशील घुले या 32 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
या गुन्ह्याबाबत अधिक माहिती देत असताना पिंपरी-चिंचवड शहराचे उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या 2 महिलांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. माधुरी संदीपान पवार (मूळगाव बेलवडे ता.कराड जि. सातारा) व संजीवनी निलेश पाटणे (रा. नेसरी ता. गडिंग्लज जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या या महिलांची नावे आहेत.
पीडित महिला सुमित्रा हिचे निगडी येथे ब्युटी सलून आहे आणि तिथेच माधुरीची तिची ओळख झाली व काही दिवसांनी ही ओळख मैत्रीमध्ये बदलली. मी रेल्वे विभागात तिकीट चेकर (T.C) आहे असे सांगून माधुरी ने T.C चे कपडे, आयकार्ड दाखवून सुमित्राचा विश्वास संपादन केला.