सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी पुणे पोलिसांना मोठे यश; सौरभ महाकाळला अटक
पुणे: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. मुसेवालाची हत्या करणाऱ्यांपैकी दोन जण पुण्यातील होते. त्यातील सौरभ महाकाल याला पुणे ग्रामिण पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्या प्रकरणातील पुण्यातील दुसरा आरोपी म्हणजे संतोष जाधवचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. त्याचे काही फोटोही पोलिसांच्या […]
ADVERTISEMENT
पुणे: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. मुसेवालाची हत्या करणाऱ्यांपैकी दोन जण पुण्यातील होते. त्यातील सौरभ महाकाल याला पुणे ग्रामिण पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्या प्रकरणातील पुण्यातील दुसरा आरोपी म्हणजे संतोष जाधवचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. त्याचे काही फोटोही पोलिसांच्या हाती लागले आहेत.
ADVERTISEMENT
सीसीटीव्हीच्या आधारे पुणे पोलिसांनी संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ याची ओळख पटवली आहे. त्यामुळे सिद्धू मुसेवालावर हल्ला करणाऱ्या शूटर्सचा शोध दिल्लीपासून पुण्यापर्यंत घेतला जात आहे. पुणे पोलिसांकडून संतोष जाधव आणि सौरभ महाकाळची माहिती पंजाब पोलिसांना देण्यात आली होती. दरम्यान पोलिसांच्या हाती संतोष जाधवचे काही जुने फोटो लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या मंचर गावचा आहे.
मागच्या आठड्यात आठ जणांनी मुसेवालाची हत्या तब्बल दोन डझन गोळ्या घालून केली होती. त्याच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या झाल्यानंतर सबंध पंजाबमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. सिद्धूच्या आई-वडीलांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार संतोष जाधवच्या विरुद्ध एका हत्येचा गुन्हा खेड पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे. त्याचबरोबर अनेक गुन्हेगार संतोष जाधवच्या संपर्कात असल्याचीही माहिती पोलिसांना प्राथमिक तपासातून मिळाली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT