ऐकावं ते नवलच ! वाळत घातलेल्या अंडरवेअरवरुन पोलिसांनी लावला आरोपीचा छडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अखत्यारित येणाऱ्या हिंजवडी पोलीसांनी एका खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आरोपीच्या शोधादरम्यान पोलिसांना एका वाळत घातलेल्या अंडरवेअरवरुन आरोपीचा सुगावा लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

ADVERTISEMENT

हिंजवडी परिसरातील हुलावळे बेंद्रे वस्तीत राहणाऱ्या संतोष माने या ३८ वर्षीय व्यक्तीची हत्या झाली होती. राहत्या घरी धारदार शस्त्राने संतोष यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सरस्वती माने यांनी हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी चौकशीला सुरुवात करुन आजुबाजूच्या राहणाऱ्या व्यक्तींकडे चौकशी केली. परंतू हत्येच्या दिवशी कोणीच बाहेरचा व्यक्ती त्या भागात आलेला नव्हता असं पोलिसांना समजलं. त्यामुळे संतोष यांची हत्या का केली असेल असा प्रश्न पोलिसांना पडला.

यावेळी पोलीस चौकशी करत असताना त्यांची नजर संतोष माने याच्या घरासमोर असलेल्या एका घरावर पडली. घराच्या दोरीवर कपडे वाळत घातले होते त्यापैकी फक्त अंडरवेअरच ओली होती. घरातले सगळे कपडे वाळलेले असताना रात्रीच्या वेळी फक्त अंडरवेअरच ओली कशी काय? या मुलाने रात्री आंघोळ का केली असावी असा प्रश्न पडल्यानंतर पोलिसांनी २३ वर्षीय कैलास डोंगरे या युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं, आणि पोलिसांचा हाच अंदाज खरा निघाला.

हे वाचलं का?

पोलीस चौकशीदरम्यान आरोपी कैलासने गुन्ह्याची कबुली दिली. मयत संतोष माने आणि त्याची पत्नी सरस्वतीचं आपल्या आई-वडिलांशी सारखं भांडण व्हायचं. त्या कारणावरुन चिडलेल्या कैलासने संतोषला संपवायचं मनात पक्क केलं होतं. ३ ऑक्टोबर रोजी संतोष घरात एकटाच असल्याचं पाहून कैलास घरात घुसून तीक्ष्ण हत्याराने वार करत संतोषची हत्या केली. हिंजवडी पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेबद्दल त्यांचं कौतुक केलं जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT