Dhananjay Munde : अंजली दमानियांनंतर RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचेही धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
खोटे बोलून जीआर काढला वगैरे असे म्हणणे म्हणजे निव्वळ हास्यास्पद, मीडिया ट्रायल करणे आणि आपल्या अर्धवट बुद्धीचे प्रदर्शन करणे आहे असं मुंडे म्हणाले होते. त्यावर आता विजय कुंभार यांनी सडेतोड उत्तर दिलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अंजली दमानियांच्या आरोपांवर विजय कुंभार काय म्हणालेँ?
पुण्यातील RTI कार्यकर्ते विजय कुंभार काय म्हणाले?
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांच्या विषयावर आता आणखी एक गंभीर प्रतिक्रिया समोर आली असून, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हे गंभीर आरोप केले असून,त्यांनी धनंजय मुंडे यांनी अंजली दमानियांना जे उत्तर दिलंय, ते खोडून काढल्याचं पाहायला मिळालं.
विजय कुंभार यांची पोस्ट काय?
"काल धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर झाल्याचे भासवून शासन आदेश काढल्याचे आरोप झाले.त्यानंतर काही जणांनी, असं घडणं शक्य नाही.मंत्रिमंडळातील ठराव झाले नसताना झाले असल्याचे भासवणे शक्य नाही, अशी भाषा वापरायला सुरुवात केली.
परंतु हे काही प्रथमच घडलं आहे.अशातला भाग नाही.यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. मी स्वतः त्याबाबत तक्रार केली होती. महाराष्ट्रातील बहुचर्चित आपत्कालीन रुग्णसेवेसाठी ॲम्बुलन्स घेण्याचा प्रस्तावही वादात होता.त्यामध्येही १३ मार्च २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झाला आहे असं भासवून १५ मार्च रोजी लगेच त्याच्या कामाचा शासन आदेश काढण्यात आला होता.
हे ही वाचा >>Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये शिवजयंतीच्या रॅलीमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फोटो, नेमकं चाललंय तरी काय?
यासंदर्भात मी मंत्रालयात मुख्य सचिव कार्यालयात कागदपत्रांचे अवलोकन केले असता तो प्रस्ताव अतिरिक्त प्रस्ताव म्हणून बैठकीत ठेवला होता परंतु तो मंजूर झाला नव्हता असे दिसून आले.(मंत्रिमंडळ बैठकीत नियमित आणि अतिरिक्त अशा दोन कार्यपत्रिका ठेवण्यात येतात. दोन्ही पैकी मंजूर झालेल्या प्रस्तावांचे नंतर एकत्रित इतिवृत्त तयार करण्यात येते.) या बाबतची जनहित याचिकाही मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतली आहे.










