पुणे विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई तक

पुणे विद्यापीठासह अन्य महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पुरंदर तालुक्यातील निरा येथील एका प्रिंटींग प्रेसवर धाड टाकत तिघांना ताब्यात घेत त्यांच्यावर जेजूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश संपत जावळे (रा. नीरा), मनोज धुमाळ (रा. नीरा) आणि वैभव लोणकर (रा. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणे विद्यापीठासह अन्य महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पुरंदर तालुक्यातील निरा येथील एका प्रिंटींग प्रेसवर धाड टाकत तिघांना ताब्यात घेत त्यांच्यावर जेजूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश संपत जावळे (रा. नीरा), मनोज धुमाळ (रा. नीरा) आणि वैभव लोणकर (रा. बारामती) या तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप येळे यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी पुणे विद्यापीठाकडे याबाबत शहानिशा करून घेतली. त्यानंतर नीरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेसमध्ये धाड टाकली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले. त्यांच्यावर जेजूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp