पुणे : गोड बोलून आईला शेतात नेलं अन् केली हत्या; वडिलांचाही तोडला अंगठा; मुलाचं क्रूर कृत्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औषधांचा ओव्हरडोस देऊन आईची हत्या केल्याची पुणे शहरातील घटना ताजी असतानाच पुणे जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. जमिनीची वाटणी करून देत नसल्याच्या कारणातून मुलाने आई-वडिलांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. मुलाने केलेल्या हल्ल्यात आई जागेवरच गतप्राण झाली, तर वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील काझड येथे घडली.

ADVERTISEMENT

वालचंदनगर पोलीस ठाण्यात अमित पांडुरंग नरुटे (वय 31, रा. काझड, सिधोबा वस्ती, ता. इंदापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वडील पांडुरंग बाबुराव नरुटे (वय 60) यांनी फिर्याद दिली आहे.

पुणे : आधी औषधांचा ओव्हरडोस… नंतर दोरीने आवळला गळा; आईची हत्या करून स्वतःलाही संपवलं

हे वाचलं का?

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनेची माहिती दिली. आरोपी अमित जमिनीची वाटणी करून देत नसल्याने आई-वडिलांसोबत सतत भांडण करत होता. रविवारीही शेतात पाईपलाईन जोडायला जाऊ असे म्हणून आई अलका पांडूरंग नरुटे यांना शेतात घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने कोयत्याने त्यांच्या डोक्यावर कपाळावर वार केले. या हल्ल्यात अलका नरुटे यांचा जागेवरच मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

आईचा मृतदेह शेतात ठेवून नंतर आरोपी अमित पुन्हा घरी गेला. घरी आल्यानंतर आरोपीने शेतात चला असं म्हणत शेतात जाण्यासाठी वडिलांकडे आग्रह धरला. मात्र, वडिलांना संशय आला. वडिलांनी अमित सोबत जाण्याचं टाळलं. त्यावरून चिडलेल्या अमितने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये पांडुरंग नरुटे यांच्या दोन्ही हाताच्या अंगठ्यास व डाव्या हाताच्या दंडावर वार करून गंभीर जखमा झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

जुन्नर: चारित्र्याच्या संशयावरून 59 वर्षीय पतीने केली 51 वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या

यामध्ये त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा तुटून पडला. हल्ल्यानंतर शेजारीपाजारी आरडाओरड ऐकून धावून आले. त्यानंतर आरोपी फरार झाला. या प्रकरणाची तक्रार दिल्यानंतर वालचंदनगर पोलिसांनी अमित पांडुरंग नरुटे यांच्या विरोधात भा.द.वी. कलम- 302, 307,323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. वालचंदनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एन. लातूरे करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT