Pune viral video : ‘मला वाचवा, ड्रायव्हर मला किडनॅप करतोय’ या आरोपांवर पीएमपीएमएलचा खुलासा
पुणे : पुणे महानगर परिवहन मंडळ अर्थात पीएमपीएमएलच्या बसमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये एक तरुण चालकाशेजारी उभं राहून मला माझ्या ऑफिस समोर सोडा म्हणून ड्राइव्हरच्या केबिनमध्ये जोरजोरात आरडाओरडा करत आहे. मात्र त्यानंतरही ड्रायव्हरने दरवाजा न उघडल्यामुळे तरुण थेट “वाचवा रे वाचवा. मला वाचवा! मला ड्रायव्हर किडनॅप करत आहे. ड्रायव्हर […]
ADVERTISEMENT
पुणे : पुणे महानगर परिवहन मंडळ अर्थात पीएमपीएमएलच्या बसमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये एक तरुण चालकाशेजारी उभं राहून मला माझ्या ऑफिस समोर सोडा म्हणून ड्राइव्हरच्या केबिनमध्ये जोरजोरात आरडाओरडा करत आहे. मात्र त्यानंतरही ड्रायव्हरने दरवाजा न उघडल्यामुळे तरुण थेट “वाचवा रे वाचवा. मला वाचवा! मला ड्रायव्हर किडनॅप करत आहे. ड्रायव्हर मला त्रास देत आहे”, अशा प्रकारचा आरोप करताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पीएमपीएमएलला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र या सगळ्या वादावर अखेरीस आता पीएमपीएमएलने स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डेलवरुन ट्विट करुन या आरोपांवर खुलासा करतं नेमकं काय घडलं हे ही पीएमपीएमएलने सांगितलं आहे.
चाफेकर चौक, चिंचवड येथे बसमध्ये एका प्रवाशाने 2 महिला प्रवाश्यांसोबत गैरवर्तणूक केली. संबंधित महिलांनी त्याला नम्रपणे दूर उभे राहण्यास सांगितले पण त्याने वाहक आणि इतर प्रवाशांनाही शिवीगाळ केली. सर्व प्रवाशांच्या विनंतीमुळे संबंधित प्रवाश्याला समज देऊन सोडण्यात आले.#pmpml pic.twitter.com/7hXhpn5ixa
— Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (@PMPMLPune) October 15, 2022
पीएमपीएमएलने काय स्पष्टीकरण दिलं?
चाफेकर चौक, चिंचवड येथे पीएमपीएमएल बसमध्ये एका प्रवाशाने दोन महिला प्रवाश्यांसोबत गैरवर्तणूक केली. संबंधित महिलांनी व इतर प्रवाशांनी त्याला विनम्रपणे तिथून दूर उभे राहण्यास सांगितले, पण त्याने वाहक आणि इतर प्रवाशांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर संबंधित वाहकाने प्रसंगावधान राखून तात्काळ या घटनेची माहिती पीएमपीएमएलच्या बालेवाडी आगार प्रमुख श्री. दत्तात्रय माळी यांना दिली व त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार करण्याचे ठरविले.
हे वाचलं का?
यानंतर बसचे दरवाजे उघडून पळून जाण्यासाठी संबंधित प्रवाशाने चालकाच्या डॅशबोर्डवरील बटणे दाबण्यास सुरुवात केली, मात्र चालकाने सतर्क राहून बसचे सर्व दरवाजे बंद ठेवले. यानंतर प्रवाशाला आपली चूक समजली आणि पोलिसांकडे नेल्यास तो अडचणीत येईल हे ओळखून त्याने चालकावर आरडाओरडा सुरु केला. नंतर मात्र सर्व प्रवाशांच्या विनंतीमुळे संबंधित प्रवाश्याला समज देऊन सोडण्यात आले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT