बस चालकाला फिट, प्रवासी महिलेने स्टेअरिंग सांभाळत वाचवले प्राण; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्याच्या युगात समाजामध्ये प्रत्येक बाबतीत महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक बाबतीत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवत आहेत. एका महिलेवर संपूर्ण कुटुंब व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी असते असं म्हटलं जातं. प्रत्येक महिला ही जबाबदारी योग्य पद्धतीने पूर्ण करत असते. पुण्यातील वाघोली येथे नुकताच या गोष्टीचा प्रत्यय आला आहे. जिथे एका महिलेने बस चालकाला बस चालवताना फिट आल्यानंतर प्रसंगावधान राखत स्वतःच्या हातात स्टेअरिंग घेत चालकासह आपल्यासोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचे प्राण वाचवले आहेत.

ADVERTISEMENT

योगिता सातवं असं या महिलेचं नाव असून तिने केलेल्या धाडसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

हे वाचलं का?

पुण्याजवळील वाघोली येथे महिलांचा एक ग्रूप बसने मोराची चिंचोळी येथे पर्यटनासाठी निघाला होता. यावेळी बस चालवत असताना चालकाला अचानक फिट आल्यामुळे त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. योगिता सातव यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी चालकाला गाडी शेजारी थांबवायला सांगितलं. चालकाने ही गाडी शेजारी थांबवली असतो तो कोसलळला. यानंतर योगिता यांनी परिस्थितीचं भान राखून बसंच स्टेअरिंग हातात घेतलं आणि बस हॉस्पिटलच्या दिशेने नेली.

योगिता यांनी याआधी कधीही बस चालवलेली नव्हती. त्यांना फक्त कार चालवण्याचा अनुभव आहे. परंतू समोर आलेला बाका प्रसंग पाहता हार न मानता योगिता यांनी बस चालवत ती सुरक्षितपणे हॉस्पिटलमध्ये पोहचवत चालकाला जिवनदान दिलं आहे. योगिता सातव यांनी जवळपास १० किलोमीटरपर्यंत बस चालवत धीराने परिस्थिती हाताळत या चालकाचे प्राण वाचवत आपल्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनाही कसला त्रास होणार नाही याची काळजी घेतली.

ADVERTISEMENT

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून योगिता सातव यांनी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT