एकनाथ शिंदेंच्या धावत्या भेटीत युवासेनेला धक्का, महाराष्ट्र सहसंघटक उद्या देणार राजीनामा

मुंबई तक

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या धावत्या भेटीनंतर पुणे शहरात शिवसेनेला अजून एक खिंडार पडले आहे. शिवसेनेच्या युवा सेनेचेमहाराष्ट्र सहसंघटक किरण साळी उद्या राजीनामा देणार आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणारआहेत. साळी यांच्यासह पुणे शहराचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले हे देखील राजीनामा देणार आहेत. उद्या उद्धव ठाकरे यांच्याकडेते राजीनामा देणार आहेत. दरम्यान या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या धावत्या भेटीनंतर पुणे शहरात शिवसेनेला अजून एक खिंडार पडले आहे. शिवसेनेच्या युवा सेनेचेमहाराष्ट्र सहसंघटक किरण साळी उद्या राजीनामा देणार आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणारआहेत. साळी यांच्यासह पुणे शहराचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले हे देखील राजीनामा देणार आहेत. उद्या उद्धव ठाकरे यांच्याकडेते राजीनामा देणार आहेत.

दरम्यान या अगोदर पुण्यातील सलग तीनवेळा सेनेचे नगरसेवक राहिलेले प्रमोद भानगिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्राचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेला सोडचिठ्ठी देणारे आणि शिंदे यांनापाठिंबा देणारे भानगिरे हे पुण्याचे पहिले माजी नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेत 2017 ते 2022 पर्यंत शिवसेनेचे 10 नगरसेवकहोते.

प्रमोद भानगिरे यांना विश्वास आहे की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणखी बरेच जण एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देतील.मुंबई तकशी बोलताना प्रमोद भानगिरे म्हणाले, “माझी भूमिका स्पष्ट आहे, मला शिवसेना फोडायची नाही, पण अनेकतळागाळातील शिवसैनिक आहेत ज्यांना एकनाथ शिंदेंच्या गटात जाण्याची इच्छा आहे”.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. शिवसेनेमध्ये सध्या दोन गट पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट असे दोन गट सध्या आहेत. दरम्यान अनेक शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील व्हायला लागले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp