अनिल परब यांची ईडीकडून ९ तास चौकशी, अटकेची टांगती तलवार

दिव्येश सिंह

महाराष्ट्रात एकीकडे एकनाथ खडसेंच्या बंडामुळे राजकीय भूकंप झालेला असताना दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी अद्यापही सुरूच आहे. ही चौकशी संपल्यानंतर अनिल परब यांना अटक होण्याची शक्यता आहे. अनिल परब यांचे समर्थक ईडी कार्यालायसमोर जमले आहेत. अनिल परब यांच्याशी संबंधित […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात एकीकडे एकनाथ खडसेंच्या बंडामुळे राजकीय भूकंप झालेला असताना दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी अद्यापही सुरूच आहे. ही चौकशी संपल्यानंतर अनिल परब यांना अटक होण्याची शक्यता आहे. अनिल परब यांचे समर्थक ईडी कार्यालायसमोर जमले आहेत.

अनिल परब यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर २७ मे रोजी ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वीच ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र ते गेले नाहीत. आज एकीकडे हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना दुसरीकडे अनिल परब हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. ही चौकशी संपलेली नाही. आज अनिल परब यांना अटक होण्याची शक्यता आहे.

एका रिसॉर्टमुळे कसे अडकत गेले अनिल परब?

हे वाचलं का?

    follow whatsapp