Rahul Gandhi: भारत जोडो यात्रा लोकांच्या ‘मन की बात’ साठी, भाषणात नरेंद्र मोदींना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आम्ही लोकांच्या मन की बात ऐकण्यासाठी इथे आलो आहोत असं म्हणत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमावरून टोला लगावला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही सध्या महाराष्ट्रात आहे. आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळते. भारताची जनता ही आमची शक्ती आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच सगळ्या जनतेचे आभारही मानले. वीर सावरकर यांच्यावर आपल्या भाषणात राहुल गांधीनी टीका केली आहे.

काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी?

मी जेव्हा भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा भाजपचे लोक म्हणू लागले की यात्रेचा अर्थ काय आहे? मी त्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक राज्यात आपल्या देशातले महापुरूष होऊन गेले आहेत. महाराष्ट्राला आणि भारताला छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिशा दिली. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांनी मार्ग दाखवला आहे. यापैकी कुणीही तिरस्कार पसरवला नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सांगितलं होतं की गरीबांना ठार करा? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी सगळ्यांनी जोडण्याची भाषा केली होती. भारत जोडो यात्राही याच उद्देशाने निघाली आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं तोच विचार आम्ही घेऊन जात आहोत.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आम्ही या यात्रेतून पुढे घेऊन जात आहोत असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भारत जोडो यात्रेला ७० दिवस झाले. या यात्रेत हिंसाचाराची एकही घटना घडली नाही. तसंच कुणालाही त्याची जात, धर्म विचारलं जात नाही. कुणी पडलं तर त्याला सगळे मिळून उचलतात. यात्रा काढली आहे ती कुणालाही मागे टाकण्यासाठी नाही. आमच्यासोबत शेतकरी चालत आहेत, मजूर चालत आहेत, युवक चालत आहेत, माता-भगिनी चालत आहेत आम्ही सगळे त्यांच्यासाठीच रस्त्यावर उतरलो आहोत.

तुमच्या कुटुंबात तुम्ही एकत्र राहता आहात तिथे कुणी आलं आणि सांगितलं की तुम्ही तुमच्या भावाला मारा तर कुटुंब संपेल. जर कुटुंब संपणार आहे. भारतात हेच केलं जातं आहे. शेतकरी, युवक, बेरोजगार युवक सगळ्यांचे प्रश्न आहेत. आम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT