Raj Kundra Pornography case: 1500 पानांचं आरोपपत्र दाखल, 58 साक्षीदारांच्या साक्षींची नोंद
राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणात 1500 पानांचं आरोपपत्र मुंबई पोलिसांनी दाखल केलं आहे. या प्रकरणी एकूण 58 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे आरोपपत्र दाखल केलं आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यासह चार जणांविरोधात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात पीडित मुलींचा लैंगिक छळ […]
ADVERTISEMENT

राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणात 1500 पानांचं आरोपपत्र मुंबई पोलिसांनी दाखल केलं आहे. या प्रकरणी एकूण 58 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे आरोपपत्र दाखल केलं आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यासह चार जणांविरोधात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात पीडित मुलींचा लैंगिक छळ करणे, त्यांची फसवणूक करणं तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार पोलिसांनी आरोप लावले आहेत. प्रामुख्यानं सध्या राज कुंद्रासह अटकेत असलेला त्याचा कर्मचारी रायन थॉर्पवर पोलिसांनी हे आरोप दाखल केले आहेत.
पॉर्न चित्रफीत निर्माण करून त्याच्या प्रसारणासाठी कुंद्राने 2019 मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न चित्रफीती प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले हॉटशॉट्स नावाचे अॅप्लिकेशन लंडनस्थित केनरीन कंपनीला विकले. पण या अॅप्लिकेशनबाबतची बरीच कामे कुंद्रामार्फतच चालू होती. या अॅप्लिकेशन निर्मितीसाठी राज कुंद्राने पैशांची गुंतवणूक केली होती.
राज कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. कुंद्रासह मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील अॅप्लिकेशनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली होती. त्याचाविरोधातही गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी ३७ वे न्यायालय यांच्याकडे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.