पोर्नोग्राफी केस: मुंबई पोलीस करणार शर्लिन चोप्राची चौकशी, पाठवलं समन्स
मुंबई: मुंबई पोलीस क्राईम ब्राँच सध्या पॉर्नोग्राफी प्रकरणी अतिशय बारकाईने तपास करत आहे. या प्रकरणात प्रत्येक पैलूवर त्यांनी लक्ष ठेवलं आहे. या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. पोलीस सातत्याने या प्रकरणाशी निगडित लोकांची चौकशी करत आहेत. याच प्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँचच्या प्रॉपर्टी सेलने […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई पोलीस क्राईम ब्राँच सध्या पॉर्नोग्राफी प्रकरणी अतिशय बारकाईने तपास करत आहे. या प्रकरणात प्रत्येक पैलूवर त्यांनी लक्ष ठेवलं आहे. या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. पोलीस सातत्याने या प्रकरणाशी निगडित लोकांची चौकशी करत आहेत. याच प्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँचच्या प्रॉपर्टी सेलने समन्स पाठवलं आहे. शर्लिनला आज (6 ऑगस्ट) चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
शर्लिनने राज कुंद्रावर केले आहेत आरोप
शर्लिनने राज कुंद्रावर अनेक आरोपही केले आहेत. शर्लिनच्या मते, राज कुंद्राने तिला अडल्ट मूव्हीच्या व्यवसायात ढकलले आहे. राजने तिला अडल्ट कंटेंटमध्ये काम करण्यास सांगितले होते. पहिले एक रोल देखील ऑफर केली होती. त्यानंतर तिला अडल्ट कंटेंट बनविण्यास सांगितलं होतं. राजने तिला त्याच्या हॉटशॉट अॅपसाठी शूट करायला सांगितले होते. मात्र, शर्लिन चोप्राने यासाठी नकार दिला होता.
शर्लिनचा आर्म्सप्राईम मीडियाशी करार