बाबासाहेब पुरंदरेंची ‘ती’ इच्छाही पूर्ण; राज ठाकरेंनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितली आठवण
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना समाजातल्या सगळ्याच दिग्गजांनी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली वाहिली आहे. काय म्हणाले आहेत राज ठाकरे? इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब […]
ADVERTISEMENT
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना समाजातल्या सगळ्याच दिग्गजांनी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली वाहिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत राज ठाकरे?
इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली ‘बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातली आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायमच मार्गदर्शन मिळत राहिलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, पण मला पितृतुल्यही होते.
हे वाचलं का?
बाबासाहेब मला नेहमी सांगत, ‘महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला आहे, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा गेलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे ती म्हणजे महाराज जिथे गेले आहेत तिथे जायची”. शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला. इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण, सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली’ असं ट्विट करत राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहिली आहे.
इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली ! #शिवशाहीर #श्रद्धांजली pic.twitter.com/x7xRdQzalr
— Raj Thackeray (@RajThackeray) November 15, 2021
ADVERTISEMENT
बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुण्यात झाला होता. त्यामुळे पुणे हीच त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी होती. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘नारायण राव पेशवा’,‘केसरी’ यासारखी अनेक पुस्तकं लिहली. पण ‘राजा शिवछत्रपती’ या कांदबरीने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. याच कांदबरीमुळे बाबासाहेब हे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले.
ADVERTISEMENT
याच कादंबरीवर आधारित पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’हे नाटकही लिहलं. जे महाराष्ट्रात प्रचंड गाजलं. त्यांनी खऱ्या अर्थाने एका भव्यदिव्य नाटकांची निर्मिती केली होती. ज्याच हिंदीत देखील अनुवाद करण्यात आला होता. दरम्यान, फडणवीस सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित केलं होतं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते देखील होते. अनेकदा ते संघाच्या जाहीर कार्यक्रमात देखील सहभागी व्हायचे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT