राज ठाकरे काल, आज आणि उद्या? मुंबईतल्या दादरमधलं बॅनर चर्चेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाचे पडसाद दोन दिवस झाले तरी उमटतच आहेत. मुंबईतल्या दादर भागात बॅनर लागले आहेत. त्यामध्ये राज ठाकरेंच्या तीन भूमिका दाखवण्यात आल्या आहेत. राज ठाकरे काल, आज आणि उद्या असं म्हणत हे बॅनर लावण्यात आलं आहे. राज ठाकरेंचा मुस्लिम टोपी घातलेला फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे. ‘3 तारखेला ईद.. तोवर […]
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाचे पडसाद दोन दिवस झाले तरी उमटतच आहेत. मुंबईतल्या दादर भागात बॅनर लागले आहेत. त्यामध्ये राज ठाकरेंच्या तीन भूमिका दाखवण्यात आल्या आहेत. राज ठाकरे काल, आज आणि उद्या असं म्हणत हे बॅनर लावण्यात आलं आहे. राज ठाकरेंचा मुस्लिम टोपी घातलेला फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
‘3 तारखेला ईद.. तोवर मशिदीवरील भोंगे उतरवा, नाहीतर…’, राज ठाकरेंचा थेट अल्टिमेटम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात मशिदीच्या भोंग्यांचा प्रश्न पुन्हा बाहेर काढला होता. मशिदीवरच्या भोंग्यांवर जर सरकारने ३ मे पर्यंत निर्णय घेतला नाही तर बघाच असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. ठाण्यात राज ठाकरेंनी उत्तर सभा घेतली होती. त्यांनी त्यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर जी टीका झाली त्यावर उत्तर दिलं. आता या उत्तर सभेवरही टीका होते आहे.
हे वाचलं का?
‘ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि..’, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
दादरमधल्या बॅनरमध्ये नेमकं काय?
ADVERTISEMENT
मुंबईतल्या दादर भागात बॅनर लावण्यात आलं आहे. यामध्ये काल-आज आणि उद्या? असे तीन शब्द लिहिण्यात आले आहेत. काल या मथळ्याखाली राज ठाकरे यांचा मुस्लिम टोपी घातलेला फोटो लावण्यात आला आहे. आज या मथळ्याला भगवा रंग देऊन त्यावर पांढऱ्या अक्षरात हनुमान असं लिहिण्यात आलं आहे. तर उद्या हा बॅनर पांढरा आहे त्यावर काळ्या अक्षरात चार प्रश्नचिन्हं दाखवण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT
राज ठाकरे हे सातत्याने भूमिका बदलतात ही त्यांच्यावर सातत्याने होणारी टीका आहे. अशात आता बॅनरही तशाच प्रकारचा संदेश देतं आहे. २०१४ च्या आधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात भूमिका घेतली तसंच लाव रे तो व्हीडिओ म्हणत भाषणं केली होती. आता दोन वर्षांनी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर आणि शरद पवारांवर शाब्दिक हल्ला केला आहे. त्यावरून त्यांच्यावर टीकेचे बाण चालवले जात आहेत.
राज ठाकरे म्हणाले शरद पवार नास्तिक, बारामतीकर म्हणाले हा पाहा व्हीडिओ
दादरमध्ये झळकलेलं हे बॅनर कोणी लावलं आहे? याची माहिती समोर आलेली नाही. मात्र रामनवमीच्या दिवशी शिवसेना भवनासमोरच हनुमान चालीसा पठण कार्यक्रम घेण्यात येणार होता त्यावेळी यशवंत किल्लेदार यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. आता हा बॅनर चर्चेचा विषय ठरतो आहे मात्र तो कुणी लावला ते समजू शकलेलं नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT