Rajya sabha Election : हे एका जातीचं, धर्माचं राजकारण करणारे लोक; संजय राऊत भाजपबद्दल काय म्हणाले?

मुंबई तक

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांबद्दल चर्चा होतेय. त्यातच आता भाजपने निष्ठावंतांना डावलल्याचा सूरही उमटू लागला आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबईत पत्रकारांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील नेतृत्व आणि राज्यसभा निवडणुकीबद्दल भाष्य केलं. राज्यसभा निवडणूक 2022 : महाविकास आघाडी की भाजप… कुणाकडे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांबद्दल चर्चा होतेय. त्यातच आता भाजपने निष्ठावंतांना डावलल्याचा सूरही उमटू लागला आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मुंबईत पत्रकारांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील नेतृत्व आणि राज्यसभा निवडणुकीबद्दल भाष्य केलं.

राज्यसभा निवडणूक 2022 : महाविकास आघाडी की भाजप… कुणाकडे आहे जास्त संख्याबळ?

“सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे की तेच मुख्यमंत्री राहणार. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, राहुल गांधी आणि सोनिया गांधी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खुश आहेत,” असं राऊत म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp