मोदी म्हणाले- शेतकरी एक कॉल दूर, टिकैत म्हणाले नंबर द्या, कॉल करतो
कृषी कायद्यावरून शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहे. त्यावर अजून कोणताच तोडगा नजरेसमोर दिसत नाही. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरवातीलाच सर्वपक्षीय बैठक घेतली. आणि शेतकरी आपल्यापासून केवळ एक कॉल दूर आहेत, असं मोदी म्हणाले. पंतप्रधानांच्या याच वक्तव्यावर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिलीय. राजेश टिकैत म्हणाले, ‘त्यांनी […]
ADVERTISEMENT
कृषी कायद्यावरून शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहे. त्यावर अजून कोणताच तोडगा नजरेसमोर दिसत नाही. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरवातीलाच सर्वपक्षीय बैठक घेतली. आणि शेतकरी आपल्यापासून केवळ एक कॉल दूर आहेत, असं मोदी म्हणाले. पंतप्रधानांच्या याच वक्तव्यावर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिलीय.
ADVERTISEMENT
राजेश टिकैत म्हणाले, ‘त्यांनी मला नंबर द्यावा. आम्ही लगेच फोन लावतो. ज्यांच्याकडे आमचा नंबर गेलाय, ते लोक आम्हाला फोन करून शिवीगाळ करत आहे. त्यामुळे पंतप्रधान अशा कुठल्या कॉलविषयी बोलत असतील तर त्यांनी आम्हाला त्यांचा नंबर द्यावा.’
हे वाचलं का?
पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीचं नेतृत्व करताना शेतकरी नेत्यांना एक आवाहन केलं होतं. त्यात त्यांनी सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना सर्व मुद्यांवर चर्चा करण्याचं आश्वासन दिलं होतं.
तसंच पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी आपल्यापासून एक फोन कॉल दूर आहे. शेतकऱ्यांना जो प्रस्ताव देण्यात आलाय, तो अजूनही तसाच कायम आहे आणि शेतकरी अजूनही चर्चा करू शकतात, असं स्पष्ट केलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
टिकैत यांची सरकारवर टीका
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आंदोलन परिसरात रस्त्यावर खिळे ठोकण्यात आलेत. तारांचं जाळं उभारण्यात आलंय. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अडचणी होत आहे. आता आम्हाला दिल्लीला जायचं नाही. त्यामुळे अशा खिळेबंदीची कोणतीही गरज नाही. पण यामुळे सर्वसामान्य लोकांचंच नुकसान होतंय.
पाहा राकेश टिकैत यांच्यावरचा खास व्हिडीओ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT