रामदास कदम अडकले खिंडीत, दापोलीपाठोपाठ मंडणगडही हातातून निसटण्याचे संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– राकेश गुडेकर, रत्नागिरी प्रतिनिधी

ADVERTISEMENT

पक्षनेतृत्वाविरुद्ध उघडपणे नाराजी बोलून दाखवणाऱ्या शिवसेना नेते रामदास कदम यांना पुन्हा एकदा खिंडीत पकडण्यात पक्षाला यश आलं आहे. दापोली नगरपंचायतीत शिवसेना बंडखोरांना अवघ्या २ जागा मिळाल्या. दापोलीत शिवसेना-राष्ट्रवादी युतीची सत्ता येणार असून मंडणगडमध्ये नाराज कदम यांच्या बंडखोरांनी ७ जागा जिंकत पक्षाला चांगलंच आव्हान दिलं. परंतू हेच मंडणगडही आता रामदास कदम यांच्या हातातून निसटणार असं दिसतंय.

शिवसेना-राष्ट्रवादी युतीने मंडणगडमध्ये तीन अपक्षांपैकी दोन अपक्षांचा पाठींबा मिळवण्यात यश मिळवलं आहे. दोन अपक्ष नगरसेवकांच्या साथीने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नावाचा एकूण ९ नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करण्यात आला आहे. तसं पत्र आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे मंडणगडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येणार अशी चिन्ह आहेत.

हे वाचलं का?

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड नगरपंचायतीची यावर्षीची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक होती. गेल्यावेळी इथे राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती. यापूर्वी १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, काँगेसचे ५ आणि आरपीआयचे २ नगरसेवक होते. शिवसेनेचा मंडणगडमध्ये फक्त १ नगरसेवक होता. शिवसेना आमदार योगेश कदम यांनी या भागात विशेष लक्ष घातलं होतं. त्यामुळे शिवसेनेचा जोर वाढू लागला होता. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या कथित ऑडीओ क्लिप नंतर शिवसेनेकडून दापोली आणि मंडणगड नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यात आली आणि निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेकडून शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्यात आली.

योगेश कदम यांना डावलण्यात आल्यामुळे कदम समर्थकांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.  त्यातच रामदास कदम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री अनिल परब यांच्यावर थेट आरोप केले. त्यामुळे रामदास कदम- पालकमंत्री अनिल परब हा वाद आणखीनच पेटला.

ADVERTISEMENT

नाराज शिवसैनिकांचं बंड मोडून काढण्यात पक्षाला यश, दापोलीत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी विजयी

ADVERTISEMENT

यंदाच्या झालेल्या निवडणुकीत जनतेने कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत दिलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा मिळाल्या, शिवसेनेची पाटी यंदाच्या निवडणुकीत कोरी राहिली, तर नाराज कदम समर्थक ७ जागांवर निवडून आले. ३ अपक्ष निवडून आल्यामुळे सत्तेच्या चाव्या या अपक्षांच्या हाती होत्या. या तीन अपक्ष नगरसेवकांपैकी सोनल बेर्डे आणि रेश्मा मर्चंडे यांनी राष्ट्रवादीच्या गटाला आपला पाठींबा दिला आहे.

या दोन नगरसेवकांच्या साथीने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नावाचा गट स्थापन करण्यात आला आहे. यासंदर्भातलं पत्र जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना नगरसेवकांनी दिलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, प्रकाश शिगवण यांची उपस्थित होती. त्यामुळे सद्यस्थितीत तरी मंडणगड नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT