ग्लोबल टीचर पुरस्कार स्पर्धा नेमकी काय असते

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिक्षणाला जर तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर काय चमत्कार घडू शकतो याच्या प्रत्यय दिलाय सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले…. आत्तापर्यंत हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलं आहे… जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांनी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यातून प्राथमिक फेरीसाठी पन्नास, तर अंतिम फेरीसाठी डिसले यांच्यासह दहा शिक्षकांना नामांकने जाहीर झाली होती. डिसले आणि त्यांते सहकारी , विद्यार्थी यांच्या काय प्रतिक्रिया आहेत बघूया

ADVERTISEMENT

डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळणं अभिमानाची बाब असली तरी ही स्पर्धा नेमकी काय असते, यातले जज कोण असतात आणि या स्पर्धेतून विजेता कसा निवडला जातो हे आपण जाणून घेऊया.

ही स्पर्धा नेमकी काय असते

हे वाचलं का?

ग्लोबल टीचर पुरस्काराची सुरुवात 2013 पासून झाली, वार्की फाउंडेशन ही संस्था यासाठी काम करते. शिक्षण क्षेत्रात ग्रास रुट आणि जागतिक लेव्हलला बदल घडवून आणण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. याआधी वार्की फाउंडेशनतर्फे 21 देशात एक सव्हे केला होता. त्यात शिक्षक पेशाला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही, तसेच त्यांना मिळणारे पगारही कमी आहेत आणि याचा परिणाम शिक्षणाच्य़ा गुणवत्तेवर होतो असे निष्कर्ष हाती आले. ही परिस्थिती सुधारण्यासाठी 2014 पासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. या पुरस्कारासाठी 2020 मध्ये 140 देशांमधून 12000 शिक्षकांची नामांकने आली होती.

या स्पर्धेसाठी कोण अर्ज दाखल करु शकते?

ADVERTISEMENT

ज्या व्यक्ती शिक्षकी व्यवसायात सक्रिय आहेत, कार्यरत आहेत, ज्यांना आठवड्याला किमान 10 तासांचा मुलांना शिकण्याचा अनुभव आहे असे सर्व शिक्षक या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात. ऑनलाईन किंवा पार्ट टाईम शिकवणारे शिक्षकसुध्दा यात सहभागी होऊ शकतात. फक्त हा पुसस्कार मिळाल्यानंतर पुढची किमान 5 वर्षे शिक्षकी पेशात तुम्ही राहणं बंधनकारक असतं. संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपले नावाचे नामांकन करु शकता

ADVERTISEMENT

यातले जज कोण असतात

या स्पर्धेचे परीक्षक कोण असतात तर जगभरातले शिक्षणतज्ञ्ज, पत्रकार, मुख्याध्यापक, शास्त्रज्ञ यांची एक टीम असते. त्याला ग्लोबल प्राईज अकेडमी म्हणतात . ही अँकेडमी संस्थेच्या ठरलेल्या ऩिकषांनुसार जगाभरातून आलेल्या शिक्षकांमधून एकाची निव़ड ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी करते. एकूण 150 परीक्षक या मंडळात असतात.

या पुरस्कारसाठी निकष काय असतात?

एखाद्या शाळेत, समाजात अथवा देशात शिक्षणात येणाऱ्या अडथळयांवर मात एखाद्या शिक्षकाने काही उपाय शोधून काढला असेल किंवा वर्गातल्या विद्याथ्यांच्य़ा गुणवत्तेत आणि निकालात लक्षणीय आणि सकारात्मक बदल घडवला असेल तर किंवा वर्गातल्या शिक्षणाचा उपयोग वर्गाबाहेर समाजात होऊन समाजात काही सकारात्मक बदल झाले असतील तर याशिवाय विद्यार्थांना मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन त्यांना ग्लोबल नागरिक बनवण्यास सक्षम करणे आणि त्यांना जागतिक व्यवस्थेत राहण्यासाठी सक्षम करणे

या निकषांच्या चौकटीत जे शिक्षक बसतात त्यांच्या कामगिरीची अभ्यास करत त्यांच्यातल विजेता निवडला जातो.

डिसले यांना हा पुरस्कार नेमका कशासाठी?

शिक्षक रणजितसिंह डिसले य़ांनी एक QR कोड तयार केला आणि शालेय अभ्यासक्रमाची पुस्तकं या डिजीटली कनेक्ट केली. यामुळे खेड्य़ापाड्य़ातील मुलांना हा क्युआर कोड स्कॅन करुन शिक्षण घेण सोप झाल. या उपयोग केवळ महाराष्ट्रात नव्हे तर साऱ्या देशात झाला. आज डिसले जगातल्या सुमारे 83 देशातल्या विद्यार्थांना या माध्यमातून शिकवू शकतात. देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT