Dahi Handi 2022 : रत्नागिरीत नाचताना गोविंदाचा मृत्यू, उत्सवाच्या आनंदावर विरजण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी

ADVERTISEMENT

१९ ऑगस्टला दहीहंडीचा सण राज्यात अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. मात्र रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये असलेल्या पाजपांढरी गावातील वसंत लाया चोगले या गोविंदाचा मृत्यू झाला. त्यामुळे दहीहंडीच्या उत्सवावर विरजण पडलं आहे. वसंत चोगले हा गोविंदा नाचत असताना तो खाली पडला. त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला.

दहीहंडीच्या दिवशी नेमकी काय घडली घटना?

रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावातील वसंत लाया चौगले या गोविंदाचा शुक्रवारी दहीहंडीच्या दिवशी नाचताना मृत्यू झाला. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. दापोली तालुक्यातील हर्णै पाजपंढरी गावात कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

हे वाचलं का?

यामध्ये वसंत चोगले सहभागी झाले होते. परंतु नाचत असतेवेळी अचानक त्यांच्या छातीत कळ आली, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास ही घटना घडली. वसंत चोगले पाजपंढरी गावातील होमाआळी मंडळीतले कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरतात पंचक्रोशीतील गोविंदांवर दुःखाचं सावट पसरलं.

मुंबईत १४० हून अधिक गोविंदा जखमी

राज्यभरात मोठ्या उत्साहात सण साजरा झाला, तर दुसरीकडे दहीहंडी पथकांतील अनेक गोविंदा जखमीही झाले. शुक्रवारी दिवसभरात मुंबई आणि ठाणे मिळून एकूण १४८ गोविंदा जखमी झाले. मुंबईसह आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह दिसून आला. मात्र काही ठिकाणी गोविंदांचे अपघातही झाले. मुंबईत १११ गोविंदा जखमी झाले, तर यातील ८८ जणांना उपाचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तर दुसरीकडे ठाण्यात ३७ गोविंदा जखमी झाले आहेत. तसंच २३ गोविंदांवर अजूनही उपचार सुरु आहेत. महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही गोविंदाला मोठी दुखापत झालेली नाही. तर, सुदैवाने कोणीही मृत्युमुखी पडलेलं नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT