CM शिंदे – मुकेश अंबानी भेट : रात्री उशिरा बंद दाराआड खलबत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची रात्री उशिरा भेट झाली असल्याची माहिती आहे. अंबानी यांनी शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीवेळी मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावस्कर हेही उपस्थित होते. भेटीनंतर रात्री १२.१५ वाजता अंबानी कुटुंबीय वर्षा बंगल्यावरून बाहेर पडताना दिसले.

ADVERTISEMENT

दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अदानी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी यांची भेट झाली होती. महाविकास आघाडी सरकार काळात धारावी पुनर्विकासासाठी काही बैठका घेण्यात आल्या होत्या. या प्रकल्पासाठी अदानी उद्योग समूहाचे नाव चर्चेत होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे बोलले गेले होते.

त्यानंतर आता झालेल्या शिंदे-अंबानी भेटीमुळे राजकीय वर्तूळात मोठ्या घडामोडी घडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीमध्ये काय चर्चा झाली, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. दरम्यान शिंदे आणि अंबानी यांची भेट ही राज्यातील प्रकल्पांच्या दृष्टीने असल्याचे सांगितले जात आहे.

हे वाचलं का?

राज्यांतील प्रकल्पांबाबत दोघांमध्ये चर्चा?

नुकताच राज्याच्या हातून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प निसटला आहे. वेदांताने गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. यावरुन सध्या राजकारण तापले असून महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. लाखो तरुणांचा रोजगार हिरावला गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आता अंबानी यांचा एखादा मोठा प्रकल्प राज्यात येणार का याबाबतही चर्चा केली जात आहे.

गणेशोत्सवात झालेली मुख्यमंत्री शिंदे-अंबानींची भेट

यापूर्वी गणेशोत्सव काळात मुख्यमंत्री शिंदे-अंबानी यांची भेट झाली होती. गणेशोत्सव निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबानी यांच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी अंबानी यांच्या घरच्या गणपतीचे दर्शनही घेतले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT