Vasant More: ‘एखादा सेनापती नसला म्हणून..’, बालाजीहून परतल्यावर वसंत मोरेंची पहिली मुलाखत
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. 4 मे पासून राज्यात अनेक ठिकाणी मनसेने आपलं आंदोलन सुरु केलं होतं. अशावेळी गेल्या काही दिवसापासून प्रचंड चर्चेत आलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे मात्र गायब होते. त्यामुळे मनसेमध्ये उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र, आता या सगळ्याबाबत स्वत: […]
ADVERTISEMENT

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. 4 मे पासून राज्यात अनेक ठिकाणी मनसेने आपलं आंदोलन सुरु केलं होतं. अशावेळी गेल्या काही दिवसापासून प्रचंड चर्चेत आलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे मात्र गायब होते. त्यामुळे मनसेमध्ये उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र, आता या सगळ्याबाबत स्वत: वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
वसंत मोरे हे काही दिवसांपासून तिरुपती बालाजीला गेले होते. तिथून परतल्यानंतर आज (6 मे) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भोंग्यांबाबत त्यांची नेमकी काय माहिती आहे ती देखील स्पष्ट आहे.
पाहा बालाजीहून परतल्यानंतर वसंत मोरे काय म्हणाले:
‘मी दरवर्षी बालाजीला जातो आणि अक्षय्य तृतीयेच्या दरम्यानच जातो. हे मी दीड महिन्यांपूर्वी बुकिंग केलं होतं. जेव्हा हा सगळा विषय कुठेच नव्हता. त्यामुळे माझा तो पूर्वनियोजित कार्यक्रम होता. आज जवळजवळ 17-18 वर्ष झाली मी बालाजीला जातो. परंतु मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे गेलो नव्हतो. निवडणूक झाल्यावर देखील मी जात असतो.’