Rishabh Pant : जखमी ऋषभ कधीपर्यंत मैदानावर परतणार? डॉक्टरांची माहिती
उत्तराखंडमधील रुडकीजवळ ऋषभ पंतचा भीषण कार अपघात झाला. या अपघातात ऋषभला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला डेहराडूनमधील मॅक्स रूग्णालयातमध्ये दाखल करण्यात आले. ऋषभवर उपचार सुरू असताना रूग्णालयाने त्याच्या तब्येतीबाबत वैद्यकीय बुलेटिन जारी केले आहे. या बुलेटिनमध्ये त्याच्या डोक्याचा आणि मणक्याचा एमआरआय रिपोर्ट हा नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो तो, ऋषभ […]
ADVERTISEMENT

उत्तराखंडमधील रुडकीजवळ ऋषभ पंतचा भीषण कार अपघात झाला. या अपघातात ऋषभला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला डेहराडूनमधील मॅक्स रूग्णालयातमध्ये दाखल करण्यात आले. ऋषभवर उपचार सुरू असताना रूग्णालयाने त्याच्या तब्येतीबाबत वैद्यकीय बुलेटिन जारी केले आहे. या बुलेटिनमध्ये त्याच्या डोक्याचा आणि मणक्याचा एमआरआय रिपोर्ट हा नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो तो, ऋषभ पुन्हा मैदानावर कधीपर्यंत परतणार?
Rishabh Pant : पंत अजूनही ICU मध्येच, रोहितने डॉक्टरांशी केली चर्चा
पंतची प्रकृती आता सुधारत आहे. मॅक्स रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या कपाळावर शस्त्रक्रिया केली आहे. पंतला सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, शरीराच्या अनेक भागात वेदना आणि सूज असल्याने त्यांचा एमआरआय होऊ शकला नाही. लिगामेंटच्या उपचारासाठी पंतला येत्या काही दिवसांत दिल्ली, मुंबई, इंग्लंड किंवा अमेरिकेत हलवण्यात येईल असे मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होते.
Rishabh Pant health News : पंतची प्लास्टिक सर्जरी, MRI रिपोर्टमध्ये काय?
ऋषभला मैदावर पुन्हा कधी परतता येईल याविषयी डॉक्टरांनी ‘ही’ माहिती दिली…
ऋषभला मैदानात परतण्यासाठी आणखी दोन महिने वाट पाहावी लागेल. कारण, बाह्य दुखापत बरी होण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागतात आणि लिगामेंट शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठीही वेळ लागतो. चार डॉक्टरांचे पथक ऋषभचा उपचार करत आहेत. यानंतर लिगामेंट उपचारासाठी त्याला दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. परंतु, डेहराडूनहून दुसरीकडे हलवण्यास डॉक्टरांनी नाकारले आहे.
बीसीसीआयही त्याच्या संपर्कात असून अपडेटेड माहिती घेत आहे. दिल्ली अॅंड डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशन म्हणजेच डीडीसीएचे संचालक श्याम सुंदर शर्मा डेहराडून येथे पोहोचले. त्यांनी जखमी क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या प्रकृतीची विचारपूस केली. नुकत्याच ताज्या अपडेटनुसार, हा अपघात कसा झाला असा प्रश्न शर्मा यांनी ऋषभला विचारला असता त्याने सांगितले की, अंधार होता आणि तो खड्डा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना हा भीषण अपघात झाला.
ऋषभ 3 जानेवारी 2023 पासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय आणि वन-डे सीरीजसाठी भारतीय संघाचा भाग नव्हता. फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रीहॅबसाठी जायचे होते.