बिलावरून रामायण! सदाभाऊ खोतांचा थेट पवारांवर गंभीर आरोप! ‘त्या’ ढाबा मालकाचं म्हणणं काय?
सांगोल्यात माजी आमदार सदाभाऊ खोत यांची गाडी अडवत एका ढाबा मालकाने उधारी मागितली. हा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आणि महाराष्ट्रभर पसरला. जेवणाच्या उधारीच्या प्रकरणावर बोलताना सदाभाऊ खोत यांनी थेट पवार कुटुंबालाच यात ओढलं आहे. दुसरीकडे ढाबा मालकाने सगळा घटनाक्रम सांगत जोपर्यंत उधारी मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येक गोष्टीला सामोर जाण्यास तयार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांना […]
ADVERTISEMENT

सांगोल्यात माजी आमदार सदाभाऊ खोत यांची गाडी अडवत एका ढाबा मालकाने उधारी मागितली. हा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आणि महाराष्ट्रभर पसरला. जेवणाच्या उधारीच्या प्रकरणावर बोलताना सदाभाऊ खोत यांनी थेट पवार कुटुंबालाच यात ओढलं आहे. दुसरीकडे ढाबा मालकाने सगळा घटनाक्रम सांगत जोपर्यंत उधारी मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येक गोष्टीला सामोर जाण्यास तयार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांना दिला आहे.
सदाभाऊ खोतांचं म्हणणं काय?
या प्रकारावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, “मी सोलापूर जिल्ह्यात आलो होतो. सांगोला पंचायत समितीला भेट द्यायला जात असताना, एक अनोळखी व्यक्ती माझ्यासमोर आली. माझे पैसे द्या अशी मागणी ती व्यक्ती करू लागली. मी प्रेमाने त्या व्यक्तीला विचारलं की, पैसे कशाचे आहेत? ती व्यक्ती म्हणाली हॉटेलचे बिल आहे. २०१४चं बिल आहे. तर ती व्यक्ती म्हणाली लोक जेवले होते. त्यावर मी त्याला विचारलं की, लोकांना कोण घेऊन आलं होतं. त्यावर ती व्यक्ती म्हणाली की तुमचा मुलगा घेऊन आला होता.”
“मी मुलाला विचारलं, तर तो म्हणाला मी त्याला कधी बघितलं नाही. माझे कार्यकर्ते तळहातावर चटणीभाकर घेऊन फिरले. माझ्या कार्यकर्त्यांवर आणि शेतकऱ्यांवर माझा विश्वास आहे. कोण-कोण जेवायला आलं होतं म्हटल्यावर त्याच्या डायरीमध्ये नावं होती. ती डायरी बघितल्यावर गावातील लोकांची नावं होती,” असं त्यांनी सांगितलं.