पवारांचं आडनाव आगलावे ठेवलं पाहिजे म्हणजे…; सदाभाऊंचा ‘मातोश्री’बद्दलही खोचक टोला
–विजयकुमार बाबर, सोलापूर सोलापूरमध्ये उन्हाच्या झळांबरोबर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यावरून राष्ट्रवादी आणि गोपीचंद पडळकर असा संघर्षही बघायला मिळत आहे. या मुद्द्यावर भाष्य करताना माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी आज थेट शरद पवारांवरच निशाणा साधला. यावेळी यशवंत जाधवांच्या ‘मातोश्री’बद्दलच्या नोंदीवरूनही त्यांनी खोचक टोला लगावला. सदाभाऊ खोत बोलताना म्हणाले, “गोपीचंद पडळकर […]
ADVERTISEMENT

–विजयकुमार बाबर, सोलापूर
सोलापूरमध्ये उन्हाच्या झळांबरोबर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यावरून राष्ट्रवादी आणि गोपीचंद पडळकर असा संघर्षही बघायला मिळत आहे. या मुद्द्यावर भाष्य करताना माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी आज थेट शरद पवारांवरच निशाणा साधला. यावेळी यशवंत जाधवांच्या ‘मातोश्री’बद्दलच्या नोंदीवरूनही त्यांनी खोचक टोला लगावला.
सदाभाऊ खोत बोलताना म्हणाले, “गोपीचंद पडळकर हे दुष्काळी पट्यातील एका शिक्षकाचे पुत्र आहेत. शेतात राबले आहेत. त्यांना आमदारकी मिळाली असेल आणि बहुजन समाजाच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा वापर राष्ट्रवादी जर करत असेल, तर तुम्ही जितकं दाबण्याचा प्रयत्न कराल तितकं ते उसळून वर येतील”, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
“राजमाता अहिल्याबाई होळकर धनगर बांधवांचं, बहुजन समाजाचं दैवत आहेत. तुम्ही वर्षानुवर्षे धनगर समाजाला उपेक्षित ठेवलं. त्यांना कोणत्याही योजना दिल्या नाहीत. धनगर समाजातील तरुणांना उभं केलं नाही. त्यांना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवलं. निव्वळ भावनिकतेला हात घालून त्यांना गोंजरण्याचा प्रयत्न केला.”