भास्कर जाधवांविरुद्ध शिंदे-कदमांनी डाव टाकला, 2024 साठी उमेदवार ठरला!

मुंबई तक

-राकेश गुडेकर, रत्नागिरी शिवसेनेवर दावा सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ‘बाळासाहेबांची शिवसेने’ची (balasahebanchi Shiv Sena) राज्यभर ताकद वाढण्यासाठी प्रयत्न करत असून, शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या कोकणात विशेष लक्ष दिलंय. 2024 आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात (guhagar assembly constituency) ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

-राकेश गुडेकर, रत्नागिरी

शिवसेनेवर दावा सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ‘बाळासाहेबांची शिवसेने’ची (balasahebanchi Shiv Sena) राज्यभर ताकद वाढण्यासाठी प्रयत्न करत असून, शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या कोकणात विशेष लक्ष दिलंय. 2024 आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात (guhagar assembly constituency) ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या विरोधात शिंदे गटाने रणनीती आखलीये आणि उमेदवारही निश्चित केलाय. 2024 मध्ये जाधवांविरुद्ध मैदानात असणार आहे, सहदेव बेटकर (Sahadev Betkar).

शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर भास्कर जाधवांचं पक्षात प्रमोशन झालं आणि त्यांच्याकडे नेते पदाची जबाबदारी आली. आता भास्कर जाधवांना मतदारसंघात घेरण्यासाठी शिंदे गटानं काम सुरू केलंय. खेड तालुक्यातील नांदगाव येथे झालेल्या सभेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते रामदास कदम यांनी सहदेव बेटकर यांच्या नावाची घोषणा करत इरादे स्पष्ट केले.

‘2024 च्या विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघाचा आमदार हा बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाचाच असेल. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. त्यामुळे कुणीही कितीही वल्गना करो, विजयाचा दावा करो, आमदार हा शिंदे गटाचाच असेल, ही काळ्या दगडावरची रेष आहे’, असं रणशिंग रामदास कदम यांनी या मेळाव्यात फुंकलं. तसेच ‘सहदेव बेटकर यांनी आतापासूनच कामाला लागावं’, असंही रामदास कदम यांनी यावेळी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp