गुळण्या करुन होणार कोरोनाची RTPCR चाचणी, नागपूरच्या NEERI संस्थेकडून नवीन शोध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अनेक शहरात आजही कोरोना चाचणी हा नाक आणि घशातून स्वॅब कलेक्शन करुन केली जातेयं. परंतू नागपूरच्या NEERI संस्थेने कोरोनाच्या RTPCR चाचणीसाठी सलाईन गार्गल नावाचं नवीन तंत्रज्ञान विकसीत केलं आहे, ज्यामुळे स्वॅब कलेक्शनची प्रक्रीया अधिक सोपी होणार आहे.

National Environmental Enginering Research Institiue अर्थात नीरी या संस्थेत या नवीन पद्धतीचं संधोशन करण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला RTPCR चाचणी करताना रुग्णाच्या घशात आणि नाकातला स्वॅब एका स्टिकद्वारे कलेक्ट केला जातो. अनेकदा रुग्णांना या प्रक्रीयेदरम्यान त्रास देखील होतो. परंतू सलाईन गार्गलद्वारे स्वॅब कलेक्शन हे सोपं होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या पद्धतीमध्ये रुग्णांना एका कंटेनरमध्ये द्रव्य दिलं जाईल…हे द्रव्य तोंडात घेऊन किमान १० ते १५ सेकंद गुळणी करुन ते द्रव्य पुन्हा त्यात कंटेनरमध्ये टाकायचं आहे. यानंतर हे सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येईल. महत्वाची गोष्ट म्हणजे सलाईन गार्गल पद्धतीद्वारे स्वॅब कलेक्शन करण्यासाठी तज्ज्ञ माणसांची गरज लागणार नसल्यामुळे स्वॅब कलेक्शनची प्रक्रीया अधिक जलद होईल अशी माहिती NEERI चे वैज्ञानिक कृष्णा खैरनार यांनी दिली.

ICMR ने या नवीन तंत्रज्ञानाला मान्यता दिली असून इतर सरकारी परवानग्याही लवकरात लवकर मिळतील अशी NEERI संस्थेला आशा आहे. आवश्यक त्या मान्यता मिळाल्यानंतर नागपूरपासून या तंत्रज्ञानाचा वापर सुरु करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं कृष्णा खैरनार यांनी सांगितलं. सलाईन गार्गल पद्धतीद्वारे RTPCR चाचणी करण्याचा खर्च हा अंदाजे ६० रुपयांच्या घरात असणार आहे. सध्याच्या घडीला रुग्णांना RTPCR चाचण्यांसाठी ५०० रुपये द्यावे लागतात. त्या तुलनेत सलाईन गार्गल पद्धतीद्वारे स्वॅब कलेक्शन अधिक लवकर होईल असा NEERI चा दावा आहे.

ADVERTISEMENT

आता घरच्या घरीच करता येणार कोरोना चाचणी, ICMR ची होम बेस्ड कोव्हिड टेस्टिंग किटला मंजुरी

ADVERTISEMENT

येणाऱ्या काळात भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी बोलून दाखवली आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यताही बोलून दाखवली आहे. अशा परिस्थितीत सलाईन गार्गल पद्धतीद्वारे कोरोनाची चाचणी करणं सोपं जाणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT