Maha Vikas Aghadi : संभाजीराजेंनी ‘मविआ’ची लोकसभेसाठीची ‘ती’ ऑफर धुडकावली!

भागवत हिरेकर

Sambhajiraje chhatrapati : महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडी, राजू शेट्टी याचा स्वाभिमानी शेतकरी पक्षाबरोबर संभाजीराजे छत्रपतींना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ADVERTISEMENT

Sambhaji Raj has established a Swarajya organization and initially he started preparing to contest the assembly elections.
Sambhaji Raj has established a Swarajya organization and initially he started preparing to contest the assembly elections.
social share
google news

Sambhaji Raje Chhatrapati Lok Sabha 2024 : भाजप प्रणित महायुतीकडून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात राजकीय समीकरणं जुळवली जात असताना महाविकास आघाडीकडूनही बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडून संभाजीराजे छत्रपती यांना सोबत घेण्यास इच्छुक होती, पण एका अटीमुळे संभाजीराजेंनी ऑफर फेटाळली आहे. (Maha Vikas Aghadi Offer to Sambhaji raje for lok sabha election 2024)

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर स्वतंत्र राजकारण सुरू केलं. संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना स्थापन केली असून, सुरुवातीला त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, आता ते लोकसभा निवडणुकीतही उतरणार आहेत.

हेही वाचा >> सुनील तटकरेंचा पत्ता होणार कट? भाजपचा रायगड लोकसभेसाठी प्लॅन काय?

संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. याच संदर्भाने महाविकास आघाडी त्यांना सोबत घेण्यास इच्छुक असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

महाविकास आघाडीची अट

संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर किंवा छत्रपती संभाजीनगर येथून निवडणूक लढवू शकतात, असे म्हटले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीने संभाजीराजेंना पाठिंबा देण्यास सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, त्यासाठी एक अट घातली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp