गोध्रा दंगल प्रकरण : संबित पात्रांनी अहमद पटेलांचं नाव घेत सोनिया गांधींवर केले 2 गंभीर आरोप
गुजरातमध्ये २००२ साली उसळलेल्या गोध्रा दंगलीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आला आहे. गुजरात एसआयटीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देत भाजपने थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. भाजपचे नेते संबित पात्रांनी थेट नाव घेत आरोप केले आहे. २००२ च्या गोध्रा दंगली प्रकरणात गुजरात एसआयटीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देत भाजपचे […]
ADVERTISEMENT

गुजरातमध्ये २००२ साली उसळलेल्या गोध्रा दंगलीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आला आहे. गुजरात एसआयटीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देत भाजपने थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. भाजपचे नेते संबित पात्रांनी थेट नाव घेत आरोप केले आहे.
२००२ च्या गोध्रा दंगली प्रकरणात गुजरात एसआयटीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रांनी थेट काँग्रेसच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत.
गुजरात दंगल : संबित पात्रांनी सोनिया गांधींबद्दल नेमकं काय म्हटलंय?
संबित पात्रा म्हणाले, ‘या कटाच्या मागे असलेले लोक कोण होते. अहमद पटेल यांच्या इशाऱ्यावरून तिस्ता सेटलवाड आणि इतरांनी गुजरात सरकार अस्थिर करण्याचा कट रचला. यात अहमद पटेल हे एक नाव आहे. त्यांची खरी शक्ती त्यांची बॉस सोनिया गांधी होत्या.’
‘सोनिया गांधी यांनी त्यांचे तत्कालिन राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या माध्यमातून गुजरातची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच या पूर्ण कटाच्या सुत्रधार होत्या,’ असा आरोप पात्रांनी गुजरात एसआयटीच्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देत केला.