वानखेडे कुटुंबाविरोधात नवाब मलिक यांचं घाणेरडं राजकारण, किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात नवाब मलिक अत्यंत हीन आणि घाणेरड्या दर्जाचं राजकारण करत आहेत असा आरोप आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. आज किरीट सोमय्यांची भेट क्रांती वानखेडे, यास्मिन वानखेडे आणि क्रांती रेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर मला त्यांनी हे सांगितलं की नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विट्सचा, या कुटुंबीयांच्या बदनामीचा मी तीव्र निषेध करतो असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री फक्त एका ओळीचं ट्विट केलं आहे. या ट्विटची चांगलीच चर्चा होते आहे. तसंच हे ट्विट अनेकांनी रिट्विटही केलं आहे. आर्यन खानला अखेर पंचवीस दिवसांनी आज बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला. उद्या किंवा परवा त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या नंतर नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आहे.

काय आहे नवाब मलिक यांचं ट्विट-

हे वाचलं का?

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! असं एका ओळीचं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे. हा डायलॉग शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटातील आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या या ट्विटची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होते आहे.

ADVERTISEMENT

समीर वानखेडे विरूद्ध नवाब मलिक असाही सामना आपल्याला राज्यात रंगलेला पाहण्यास मिळतो आहे. समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक गेल्या तीन दिवसांपासून व्यक्तीगत पातळीवर आरोप करत आहेत. समीर दाऊद वानखेडे असा ट्विटरवर त्यांचा केलेला उल्लेख, समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र, त्यांचा निकाहनामा या सगळ्या गोष्टी नवाब मलिक यांनी समोर आणल्या आहेत.

ADVERTISEMENT

दुसरीकडे समीर वानखेडे, त्यांची पत्नी क्रांती रेडकर, त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे या सगळ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. नवाब मलिक हे गुंडगिरीचा वापर करत आहेत त्यांना समीर वानखेडे यांना पदावरून हटवायचं आहे त्यामुळे ते असे बेछुट आरोप करत आहेत असं क्रांती रेडकरने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT