संदीपान भुमरेंकडे औरंगाबादची जबाबदारी; 22 वर्षानंतर मिळाली स्थानिक मंत्र्याला संधी
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली शिंदे सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी अखेर रविवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिंदे सरकारमध्ये रोजगार हमी योजना मंत्री असलेले संदिपान भुमरे यांची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे तब्बल 22 वर्षानंतर औरंगाबादकरांना स्थानिक पालकमंत्री मिळाले आहे. त्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत भूमरेंच्या निवडीचं स्वागत […]
ADVERTISEMENT

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली शिंदे सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी अखेर रविवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिंदे सरकारमध्ये रोजगार हमी योजना मंत्री असलेले संदिपान भुमरे यांची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे तब्बल 22 वर्षानंतर औरंगाबादकरांना स्थानिक पालकमंत्री मिळाले आहे. त्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत भूमरेंच्या निवडीचं स्वागत केलं आहे.
औरंगाबाद मंत्र्यांचा जिल्हा
एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे आणि फडणवीस सरकारमधील 3 मंत्रिपद देण्यात आले आहेत. त्यामुळे मंत्र्यांचा जिल्हा म्हणून देखील मागच्या काही महिन्यांपासून औरंगाबादला बोललं जातंय. भाजपचे औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांना सहकारमंत्रीपद देण्यात आलं होतं. तर शिंदे गटाचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना कृषिमंत्री तर संदीपान भुमरेंना रोहयो मंत्रीपद देण्यात आलं होत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागलं होतं.
युतीच्या सरकारमध्ये चंद्रकांत खैरे यांच्याकडे होती पालकमंत्रीपदाची जबाबदारी