‘दोन महिन्यांनंतर सत्ता योग नाही’, संजय राऊतांनी काढली एकनाथ शिंदेंची कुंडली

मुंबई तक

राज्याच्या राजकारणात सध्या काही मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानं केली. त्यात कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी महाराष्ट्रातल्या 40 गावं ताब्यात घेण्याची भाषा केली. हे होत नाही, तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भविष्य बघितल्याच्या घटना वादात सापडली. या सर्वच मुद्द्यांवरून खासदार संजय राऊतांनी टीकास्त्र डागलंय. खासदार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्याच्या राजकारणात सध्या काही मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानं केली. त्यात कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी महाराष्ट्रातल्या 40 गावं ताब्यात घेण्याची भाषा केली. हे होत नाही, तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भविष्य बघितल्याच्या घटना वादात सापडली. या सर्वच मुद्द्यांवरून खासदार संजय राऊतांनी टीकास्त्र डागलंय.

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रावर हल्ला केलाय. मी याला युद्ध म्हणतो. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी छत्रपतींचा अवमान सुरू केलाय. त्यावरच लक्ष विचलित करण्यासाठीच बोम्मईंना पुढे केलंय. लोकांनी छत्रपतींचा अपमान विसरावा यासाठीच हे चाललंय”, असा दावा राऊतांनी केलाय.

सरकार दुबळं आहे, शिवसेना नाही; राऊतांचा इशारा

“युपी, गुजरात इथं का पाहायला मिळत नाही? हे सारं नियोजितपणे सुरूये. हे सगळं स्क्रिप्टेड आहे. राज्यापालांनी मराठी माणसाचा अपमान केला. गुजराती, मारवाडी मुद्यावरून तो मागे टाकायला मला अटक केली. तुम्ही कितीही करस्थानं केलीत तरी राज्याची जनता विसरणार नाही. महाराष्ट्राची एक इंच भूमीही जाऊ देणार नाही. सरकार दुबळंय, पण शिवसेना नाही. टाका तुरूंगात आम्ही भीत नाही”, असा संजय राऊतांनी सरकारला दिलाय.

उद्धव ठाकरेही ‘राज्यपाल हटाव’साठी मैदानात : भाजपमधील लोकांनाही सोबतही घेण्याची तयारी

हे वाचलं का?

    follow whatsapp