संजय राऊत यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा, नारायण राणेंचा गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांचं उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर लक्ष आहे. ते शिवसेनेचे नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे. प्रवीण राऊतशी तुमचा काय संबंध? सुजीत पाटकरच्या कंपनीत तुमच्या मुली कशा काय भागीदार? असे प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केलं. तसंच शिवसेना भवन हे तुमचं कधीपासून झालं? असाही प्रश्न नारायण राणेंनी विचारला. नारायण राणे यांनी भाजपवर संजय राऊत यांनी जे आरोप केले त्याला सडेतोड उत्तरं दिली आहेत.

ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द बोलणारा माणूस हे संजय राऊतच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळत नाही हा शिवसेना नासवतो आहे. त्यांना वाटतं आहे की माझ्यानंतर कुणीच नाही शिवसेनेत. त्यामुळेच तर जेव्हा शरद पवारांना भेटायला गेलो होते तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे तिघेच होते. वाटेल ते बोलतात, त्यानंतर यांना घाम फुटतो असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

मी कोणाला घाबरत नाही. जो घाबरतो तो वारंवार म्हणतो मी घाबरत नाही. शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली परंतु त्या पत्रकार परिषदेला कोणीही नाही. पत्रकार परिषदेला फक्त नाशिकचे लोक होते. शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वत: साठी घेतली हा सवालच आहे. संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे आहे. वेळ आल्यावर मी ती बाहेर काढेन, असा इशारा नारायण राणेंनी संजय राऊत यांना दिला आहे.

पत्रकार परिषदेत राऊतांनी वापरलेले शब्द एखाद्या वृत्तपत्रकाच्या संपादकाला शोभणारे नव्हते. पत्रकाराला ही शोभणारी भाषा नव्हती. राऊतांनी काल पत्रकार परिषदेत केलेल बेताल आरोप केले आहे. प्रविण राऊत याने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर राऊत घाबरले आहेत. भाजपवर आरोप केले परंतु कोणेतेही पुरावे दिलेले नाही असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

संजय राऊत यांनी फ्रंटमॅन म्हणून नाव घेतलेले जितेंद्र नवलानी आहेत कोण?

ADVERTISEMENT

संजय राऊत हे सांगत होते की माझ्यासोबत सगळे आहेत. पण काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या बाजूला आदित्य ठाकरे नाही दिसले, उद्धव ठाकरे नाही दिसले, शरद पवार नाही दिसले. संजय राऊत सांगतात मला सोनिया गांधींचा फोन आला, मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. मला वाटतं त्यांना जो बायडेननेही फोन केला असेल. एवढी आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद घेतली पण तसं कुणी ताकदीचं पत्रकार परिषदेत दिसलं नाही असं म्हणत नारायण राणेंनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली. तसंच त्यांचा मानसिक तोल ढासळला आहे त्यांनी आता रोज पत्रकार परिषद घेणं बंद करावं असं मला वाटतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT