‘शिवाजी महाराजांची भवानी तलवारच यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार’; संजय राऊतांचा चढला पारा
प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म ठिकाणाबद्दल केलेल्या विधानावरून विरोधकांनी भाजपला घेरलं आहे. या विधानावरुन संजय राऊतांनी भाजपला उपरोधिक टोले लगावताना शिंदेंवरही निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, ‘मला असं वाटतंय की अफजल खान आणि औरंगजेब यांच्या कानात सांगतो आणि त्यानुसार हे बोलतात.’ खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांना भाजप आमदार […]
ADVERTISEMENT

प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म ठिकाणाबद्दल केलेल्या विधानावरून विरोधकांनी भाजपला घेरलं आहे. या विधानावरुन संजय राऊतांनी भाजपला उपरोधिक टोले लगावताना शिंदेंवरही निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, ‘मला असं वाटतंय की अफजल खान आणि औरंगजेब यांच्या कानात सांगतो आणि त्यानुसार हे बोलतात.’
खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांची शक्तीच यांना खतम करणार आहे. शिवाजी महाराजांची जी भवानी तलवार आहे ना… ती तलवारच यांचं मुंडकं छाटणार आहे. यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार. रोज कुणीतरी उठतो आणि शिवाजी महाराजांवर भाष्य करतो. मला असं वाटायला लागलंय की, यांच्या स्वप्नात अफजल खान आणि औरंगजेब येतोय. यांच्या कानात काहीतरी सांगतो आणि त्यानुसार हे बोलतात.”
“शिवाजी महाराजांवर अशा प्रकारे बोलण्याची यांची लायकी आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? त्यांचं महानिर्वाण कुठे झालं? हे अख्ख्या जगाला, देशाला माहितीये. रायगडावर त्यांची समाधी आहे. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झालाय. त्यात नवीन काय आहे?”, असा उपरोधिक टोला संजय राऊत यांनी लगावला.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला’, प्रसाद लाडांच्या विधानाने वादाला खतपाणी!