पंतप्रधानांनी इतर विषयांच्याच तारा जास्त छेडल्या; संजय राऊतांचं मोदींवर टीकास्त्र

मुंबई तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आढावा बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटचा मुद्दा उपस्थित करत बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडलं. त्यावरून राज्यात राजकीय वाद रंगला असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट मोदींवर टीकास्त्र डागलं आहे. संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी पंतप्रधान मोदींनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट संदर्भात मांडलेल्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर संजय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आढावा बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटचा मुद्दा उपस्थित करत बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडलं. त्यावरून राज्यात राजकीय वाद रंगला असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट मोदींवर टीकास्त्र डागलं आहे.

संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी पंतप्रधान मोदींनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट संदर्भात मांडलेल्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर संजय राऊत म्हणाले, “कालच्या बैठकीबद्दल मी बोलणं योग्य नाही. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होती. पंतप्रधान कोरोना परिस्थितीबद्दल चर्चा करणार, अशीच चर्चा होती. पंतप्रधानांनी इतर विषयावरच जास्त तारा छेडल्या. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, के.सी. राव यांची वक्तव्य बघितल्यानंतर कळेल की, तो एकतर्फी संवाद होता.”

PM Modi: ‘पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी कराच’, PM मोदींनी महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना सुनावलं!

“बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना टोमणे मारण्याचं काम जास्त झालं. पंतप्रधानांकडून ही अपेक्षा नाही. व्हॅटसंदर्भात जो विषय झाला, तो अनावश्यक होता, असं बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी बाण्याला जागून जे काही सांगायचं होतं, ते सांगितलं आहे,” असं राऊत म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp