जेव्हा बोलवणार, तेव्हा येणार पण…; 10 तासांच्या ईडी चौकशीनंतर वर्षा राऊतांनी मांडली भूमिका
शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ८ तारखेपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने शनिवारी (६ ऑगस्ट) चौकशीसाठी बोलावले होते. तब्बल १० तास त्यांची चौकशी झाली. दहा तासांच्या चौकशीनंतर वर्षा राऊत बाहेर आल्या आणि त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना वर्षा राऊत म्हणाल्या ”चौकशीला सहकार्य केलं आहे. पुन्हा […]
ADVERTISEMENT
शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ८ तारखेपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने शनिवारी (६ ऑगस्ट) चौकशीसाठी बोलावले होते. तब्बल १० तास त्यांची चौकशी झाली. दहा तासांच्या चौकशीनंतर वर्षा राऊत बाहेर आल्या आणि त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना वर्षा राऊत म्हणाल्या ”चौकशीला सहकार्य केलं आहे. पुन्हा बोलावलेलं नाही. जेव्हा बोलवणार तेव्हा येणार पण आम्ही शिवसेना सोडणार नाही आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत.”
वर्षा राऊत यांची समोरासमोर बसवून चौकशी?
ईडी कार्यालयात संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर बसवून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. ईडीला संजय राऊत यांच्या घरातून काही कागदपत्रं ईडीला मिळाली. त्यासंदर्भात काही प्रश्न विचारले जाणार असल्याती माहिती मिळाली होती.
हे वाचलं का?
वर्षा राऊत यांच्या खात्यावर कोट्यावधी रुपये जमा केले गेले- ED
पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संदर्भात ईडी तपास करत आहे. याच प्रकरणात ईडीने आता संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचं ईडीने न्यायालयाला सांगितलं होतं.
संजय राऊतांवर आरोप करतानाच ईडीने त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यावर मोठ्या प्रमाणात रकमा जमा झाल्याचं आढळून आल्याचा दावा कोर्टात केला होता. प्रविण राऊत यांच्याकडे पैसे आल्यानंतर ते वेगवेगळ्या व्यक्तीकरवी संजय राऊत यांना पोहोचवण्यात आले. सुरुवातीला १.०६ कोटी रुपये बँक खात्यावर पाठवण्यात आल्याचं आढळून आलं आहे. त्यानंतर १.१७ कोटी रुपये, आणि आता १.०८ कोटी रुपये पाठवण्यात आल्याचं ईडीने न्यायालयात सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
वर्षा राऊत यांची समोरासमोर बसवून चौकशी?
ईडी कार्यालयात संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर बसवून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. ईडीला संजय राऊत यांच्या घरातून काही कागदपत्रं ईडीला मिळाली. त्यासंदर्भात काही प्रश्न विचारले जाणार असल्याती माहिती मिळाली होती.
ADVERTISEMENT
पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊतांचं नावं कसं आलं?
प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र असून, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना त्यांचं नावही समोर आले होतं. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिल्याचं समोर आलं होतं. या कर्जाच्या रकमेतून राऊत कुटुंबानं दादरमध्ये फ्लॅट खरेदीसाठी केला होता. त्यानंतर ईडीने वर्षा आणि माधुरी राऊत यांचे जबाब नोंदवले होते.
ईडीतील सूत्रांच्या माहितीनुसार 2010 मध्ये प्रवीण राऊत यांना त्याच्या बँक खात्यात इक्विटी आणि जमीन व्यवहाराच्या नावाखाली 95 कोटी रुपये मिळाले होते, तरीही कंपनी प्रकल्प पूर्ण करू शकली नाही आणि कोणतेही उत्पन्न मिळाले नाही.
या प्रकरणात ईडीने ज्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली ते सुजित पाटकर हे प्रवीण राऊत यांचे सहकारी आहेत, तर संजय राऊत यांच्याशी जवळचे संबंध आहेत. पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलींसह वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये गेल्या वर्षभरापासून भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने यापूर्वी अलिबाग येथे संयुक्तपणे जमीन खरेदी केली होती.
या प्रकरणात ईडीने संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील जमीन जप्त केलेली आहे. याच प्रकरणात ईडीने १ जुलै २०२२ रोजी संजय राऊत यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी केली होती. या चौकशीनंतर ईडीने २० जुलै रोजी ईडीकडून पुन्हा समन्स बजावलं होतं. उपस्थित न राहिल्याने संजय राऊत यांना २७ जुलैला राऊतांना दुसरं समन्स बजावण्यात आलं होतं. पावसाळी अधिवेशनामुळे उपस्थित राहू शकत नाही, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT