शशिकांत शिंदेंचा पराभव करणाऱ्या रांजणेंचा चंद्रकांत पाटलांनी केला सत्कार; म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत जावळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. या पराभवानंतर नवीन राजकीय ट्विस्ट निर्माण होताना दिसत आहे. विजयी झालेल्या ज्ञानदेव रांजणे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अचानक भेट घेऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी रांजणे यांचं कौतुकही केलं.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे कुसुंबी गटाचे जिल्हा परिषद सदस्य अर्चना रांजणे यांचे पती व भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले ज्ञानदेव रांजणे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव केला. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (29 नोव्हेंबर) सकाळी साडेआठ वाजता ज्ञानदेव रांजणे यांचं जावळी तालुक्यातील आंबेघर येथील घरी जाऊन अभिनंदन केलं.

‘संघर्षातून ज्याने विजय मिळवला आहे, कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिडपणे निवडणूक लढवून विजयी झाले आहेत; अशा कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं व त्याचं कौतुक करणं गरजेचं असतं. यासाठीच मी जावळी तालुक्यात ज्ञानदेव रांजणे यांचं अभिनंदन करण्यासाठी आलो आहे’, असं पाटील म्हणाले. या राजकीय घटनेमुळे जावळी तालुक्यात नवा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे.

हे वाचलं का?

सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’ कसा केला?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकाच पॅनेलमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह शशिकांत शिंदे देखील होते. शशिकांत शिंदे यांच्या पराभवनंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जावळीमध्ये येऊन ज्ञानदेव रांजणे यांचा जाहीर सत्कार केला होता. शिवेंद्रराजे यांचा हा डान्स शशिकांत शिंदे यांना चांगलाच जिव्हारी लागला होता.

ADVERTISEMENT

जिल्हा बँक निवडणूक: मला हद्दपार करण्याचा प्रयत्न, व्याजासकट परतफेड करणार – आमदार शशिकांत शिंदे

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मदतीने राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केल्याने ही लढत संपूर्ण राज्यात चांगलीच गाजली. याची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अजित पवार यांनी देखील घेतली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT