पतीनं पकडले हात अन् प्रेयसीनं केले कोयत्यानं वार; अनैतिक संबंधातून पत्नीवर जीवघेणा हल्ला

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा: सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने अनैतिक संबंधातून आपल्या पत्नीसोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. नराधम आरोपीनं आपल्या प्रेयसीच्या मदतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. ज्यामध्ये संबंधित महिला ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार केले जात आहे. या प्रकरणी वाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

तन्झीला सिकंदर आतार असं हल्ला झालेल्या 30 वर्षीय फिर्यादी महिलेचं नाव आहे. त्या वाई शहरातील फुलेनगर परिसरातील रहिवासी आहेत. तर पती सिकंदर आमीन आतार (रा. फुलेनगर) आणि त्याची प्रेयसी संतोषी पिसाळ (रा. व्याजवाडी, ता. वाई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत.

आरोपी सिकंदर आतार हा विवाहित असून मागील काही दिवसांपासून त्याचं आरोपी संतोषीसोबत अनैतिक संबंध सुरू होते. या घटनेची माहिती पत्नी तन्झीला यांना मिळाल्यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होतं होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याच वादातून रविवारी 21 फेब्रुवारी रोजी आरोपी पती सिकंदर यानं आपल्या प्रेयसीच्या मदतीनं पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. आरोपी सिकंदर यानं भाजी मंडई परिसरात फिर्यादी तन्झीला यांना शिवीगाळ करत धक्‍काबुक्‍की केली. त्यानंतर चित्रा टॉकीजच्यासमोर आरोपीनं तन्झीला यांचे दोनी हात पकडून. त्याचवेळी सिंकदरची प्रेयसी संतोषी हिने तन्झीला हिच्यावर कोयत्यानं सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाली.

तन्झीला गंभीर जखमी झालेली असताना देखील नराधम आरोपी तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी तन्झीला हिला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरु केली. दरम्यान, काही वेळानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

ADVERTISEMENT

धक्कादायक ! भांडण करु नको सांगणाऱ्या वडिलांची १३ वर्षीय मुलाकडून हत्या

ADVERTISEMENT

याप्रकरणी पीडित पत्नी तन्झीला आतार यांच्या फिर्यादीवरून वाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस सिंकदर आणि त्याच्या प्रेयसीचा कसून शोध घेत आहेत. तर तन्झीला यांच्यावर वाईतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या सगळ्या प्रकारने तन्झीला यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. सध्या सातारा पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत. मात्र, अद्यापही आरोपी त्यांच्या हाती लागलेले नाहीत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT