Satish Kaushik : फार्महाऊसवर सतीश कौशिक सोबत काय झालं? पोलिसांकडून चौकशी सुरू
Satish Kaushik Death Police Inquiry : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली होती. या घटनेनंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दरम्यान सतीश कौशिक यांना अस्वस्थ वाटतं होते, ज्यानंतर त्यांना फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले […]
ADVERTISEMENT
Satish Kaushik Death Police Inquiry : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली होती. या घटनेनंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दरम्यान सतीश कौशिक यांना अस्वस्थ वाटतं होते, ज्यानंतर त्यांना फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. सतीश कौशिक यांच्या अचानक निधनानंतर पोलिसांकडून त्याचा तपास सूरू आहे. कौशिक यांच्यासोबत शेवटच्या क्षणी कोण-कोण होते, याचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान या तपासातून काय समोर येते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (satish kaushik death what happened in farmhouse delhi police are investigating)
ADVERTISEMENT
कुटुंबीयांसोबत होळी साजरी
सतीश कौशिक (Satish Kaushik)यांनी मृत्यूपूर्वी आपल्या बॉलिवूडमधील मित्र आणि कुटूंबियांसोबत होळी साजरी केली होती. सतीश कौशिकने 7 मार्चला शबाना आझमी यांच्या मुंबईतील घरात होळी साजरी केली. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेत्री महिमा चौधरी, जावेद अख्तर, ऋचा चढ्डा आणि अली फजल होते. या दरम्यानचा फोटो देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. दुपारपर्यंत होळी साजरी केल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले होते. 8 मार्चला त्यांनी दिल्लीत कुटूंबियांसोबत होळी साजरी केली. मात्र होळी खेळल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत होते. यानंतर त्यांनी दिल्लीच्या फोर्टीज रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली होती.
प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा
हे वाचलं का?
सतीश कौशिक यांच्या मृत्यूची चौकशी सुरू?
सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनानंतर त्याची बॉ़डी पोस्टमार्टमसाठी दिनदयाल रूग्णालयात नेण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी देखील कौशिक यांच्या निधनाची चौकशी सूरू केली आहे. सतीश कौशिक यांची तब्येत ज्या फार्महाऊसवर बिघडली होती, तिकडे ते कधी पोहोचले होते? आणि तिकडे काय-काय झालं होतं. इतकंच नाही तर ज्या लोकांनी सतीश यांना रूग्णालयात दाखल नेले होते. त्याच्या पोलीस संपर्कात असून चौकशी करतेय.
‘बायकोला फक्त…’, नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा गौप्यस्फोट
ADVERTISEMENT
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय?
सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे.यामध्य़े सतीश यांच्या शरीरावर जखमेचे निषाण सापडले नाही आहेत. तसेच त्यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरही पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
ADVERTISEMENT
सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 11 वर्षाची मुलगी आहे. या दोघांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान कौशिक यांच्यावर अंतिम संस्कार आज 9 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता करण्यात आले होते. यावेळी सतीश कौशिक यांना निरोप देण्यासाठी बॉलिवूडचे अनेक अभिनेते-अभिनेत्री उपस्थित होत्या.
प्रेग्नेंट नीना गुप्ताला घातलेली लग्नाची मागणी, सतीश कौशिकांचा ‘तो’ किस्सा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT