OBC आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल, Pankaja Munde यांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई तक

मराठा आरक्षणाला आमचा मुळीच विरोध नाही पण राज्यातलं ओबीसी आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल असा इशारा पंकजा मुंडे यांनी लातूरमध्ये दिला आहे. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ येऊ देऊ नका असंही पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे. लातूरमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्यात त्यांनी हा इशारा दिला आहे. काय म्हणाल्या पंकजा मुंडे? ओबीसींचं आरक्षण वाचवा, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मराठा आरक्षणाला आमचा मुळीच विरोध नाही पण राज्यातलं ओबीसी आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल असा इशारा पंकजा मुंडे यांनी लातूरमध्ये दिला आहे. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ येऊ देऊ नका असंही पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे. लातूरमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्यात त्यांनी हा इशारा दिला आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा उद्रेक होईल. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावर आणू नका. ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका. आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. हे मेळावे फक्त मेळावे नाही राहिले पाहिजे. तर यातून काहीतरी सिद्ध झालं पाहिजे. लातूरमध्ये एक लाख काय आम्ही मुंबईत 10 लाख लोकं बोलवू शकतो. आम्हाला त्याची बिलकुल चिंता नाही. तो एक दिवसही येईल. ओबीसी समाज शांत आहे, ओबीसी भोळा आहे, पण त्यालाही तिसरा डोळा आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

मराठा आणि ओबीसी समाजात वाद पेटवण्याचं पाप जर कुणी करत असेल तर आम्ही त्यालासुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही. ही आज माझी खंबीर भूमिका आहे. आमच्यामध्ये तुकडे पाडायची काही गरज नाही. एक वज्रमूठ आम्ही बनवू. ही बहुजनांची लढाई सामान्य माणसांसाठी असल्याचंही पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp