SBIची नवीन सुरक्षा प्रणाली सुरु, ATM मधून पैसै काढण्यासाठी द्यावा लागणार OTP!

मुंबई तक

एटीएमद्वारे फसवणूक टाळण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नवा नियम आणला आहे. एसबीआयच्या ग्राहकांना आता एटीएममधून पैसै काढण्यासाठी OTP द्यावा लागणार आहे. अगोदर एटीएम पिन टाकल्यानंतर लगेच पैसे निघत होते, परंतु आता खातेदारांना पैसे काढताना ओटीपी द्यावा लागणार आहे. ही सुरक्षा फक्त एसबीआयच्या एटीएममधून १० हजार किंवा त्याहून जास्त पैसे काढणाऱ्यांसाठी आहे. Introducing the OTP-based […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एटीएमद्वारे फसवणूक टाळण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नवा नियम आणला आहे. एसबीआयच्या ग्राहकांना आता एटीएममधून पैसै काढण्यासाठी OTP द्यावा लागणार आहे. अगोदर एटीएम पिन टाकल्यानंतर लगेच पैसे निघत होते, परंतु आता खातेदारांना पैसे काढताना ओटीपी द्यावा लागणार आहे. ही सुरक्षा फक्त एसबीआयच्या एटीएममधून १० हजार किंवा त्याहून जास्त पैसे काढणाऱ्यांसाठी आहे.

SBI ने 26 डिसेंबर 2019 रोजी Twitter वर जाहीर केले होते की ही सुविधा 1 जानेवारी 2020 पासून सर्व SBI एटीएमवरती लागू होणार आहे. “एटीएममधील अनधिकृत व्यवहारांपासून संरक्षण करण्यासाठी OTP-आधारित पैसे काढण्याची प्रणाली सादर करत आहे. ही नवीन सुरक्षा प्रणाली 1 जानेवारी 2020 पासून सर्व SBI ATM वर लागू होईल,” असे SBI ने ट्विट केले आहे. एसबीआय सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मद्वारे वेळोवेळी फसवणुकीबद्दल जागरूकता निर्माण करत असते. ओटीपी हा नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती पाठवला जातो. जो ओटीपी फक्त एका व्यवहारासाठी वैध असतोय

एसबीआय एटीएममधून OTP वापरुन पैसे काढण्याची पद्धत

-एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला ओटीपीची आवश्यकता लागणार आहे.

– तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp