शिवसेना भवनासमोर Shivsena आणि BJP कार्यकर्त्यांचा राडा
मुंबईत शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना भवनासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि वाद झाले आहेत. अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास (ट्रस्ट) जमीन खरेदी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यावर शिवसेनेने टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी […]
ADVERTISEMENT

मुंबईत शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना भवनासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि वाद झाले आहेत. अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास (ट्रस्ट) जमीन खरेदी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यावर शिवसेनेने टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी असं म्हटलं होतं की सरसंघचालक मोहन भागवत यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावं. तसंच सामनातून अग्रलेख लिहूनही या प्रकरणी टीका करण्यात आली होती. आता यावरूनच भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले आहेत.
राममंदिर उभारणीच्या धर्मकार्यात खोडा घालणाऱ्या @ShivSenaला भाजप युवा मोर्चाने चांगलीच फटकार दिलीय. त्याचा घाव इतका वर्मी लागलाय की, शिवसेनेच्या डरपोक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वर्दीआड लपून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले केले.
हे सैनिक कसले…अरे हे तर पळपुटे. #शिवसेनेला_फटकार pic.twitter.com/tPThrQqBmo— BJP MUMBAI (@bjp4mumbai) June 16, 2021
शिवसेनेनी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या जागेच्या व्यवहाराबाबत जे आरोप झाले त्यावर टीका केली त्यामुळे भाजयुमो तर्फे म्हणजेच भारतीय युवा मोर्चातर्फे शिवसेना भवनाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेना भवनाच्या बाहेर भाजयुमोचं आंदोनल सुरू आहे हे समजताच शिवसेना कार्यकर्तेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आणि मग दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहण्यास मिळालं.
या आंदोलनात भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते भिडल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. बळाचा वापर करून पोलिसांना या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवावं लागलं. ज्यानंतर भाजप मुंबईने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शिवसेनेवर टीका केली आहे.
राम मंदिर जमीन घोटाळा : हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहचली, सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं – संजय राऊत










