सलग दुसऱ्या दिवशी राज्यात १५ हजारापेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या राज्यात आजही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ पहायला मिळते आहे. शनिवारी राज्यात १५ हजार ६०२ नवीन रुग्ण सापडले आहेत. राज्यभरात ८८ रुग्णांनी कोरोनाशी लढताना आपले प्राण गमावले असून राज्याचा मृत्यूदर सध्याच्या घडीला २.३ टक्के इतका आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि विदर्भातील महत्वाच्या शहरांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध लावले असून काही भागांमध्ये लॉकडाउनही जाहीर केलं आहे.

ADVERTISEMENT

नागपूर : शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख चढताच, ७ जणांचा मृत्यू

दरम्यान आज दिवसभरात ७ हजार ४६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्याच्या घडीला ९२.४९ टक्के इतक आहे. दरम्यान मुंबईतही आज १ हजार ७०८ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. शहरात ५ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला पुण्यात सर्वात जास्त सक्रीय रुग्ण आहेत. पुण्यातील सक्रीय रुग्णांचा आकडा हा २४ हजार २५ इतका आहे.

हे वाचलं का?

दरम्यान सध्याच्या घडीला पुण्यात कोरोनाग्रस्त सक्रीय रुग्णांची संख्या ही २ लाखाच्या वर गेलेली आहे. ३५१ रुग्णांची परिस्थिती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने होणारी रुग्णवाढ पाहता…शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू काही दिवसांपूर्वी पालकमंत्री अजित पवार आणि विभागीय आयुक्तांच्या बैठकीत सध्यातरी पुण्यात लॉकडाउन लागू करण्यात येणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT