पुणेकरांसाठी मोठी बातमी, गणेशोत्सवाचे दहाही दिवस पुण्यात कलम 144

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: मुंबईप्रमाणेच पुण्यातही (Pune) गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2021) प्रचंड जल्लोष असतो. मात्र मागील वर्षांपासून या सणावर कोरोनाच्या सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात यावा असे आदेश राज्य सरकारने आधीच लागू केले आहेत. असं असताना आता पुण्यात गणेशोत्सवाचे दहाही दिवस म्हणजे 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

कोरोना विषाणु प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनूसार गणेशोत्सव साजरा केला जावा आणि कोरोनाचा प्रसार अधिक होऊ नये यासाठी पुणे शहरामध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी हे आदेश लागू केले आहेत.

या नियमानंतर आता पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी, सर्व धर्माची प्रार्थना स्थळे बंद आणि संचारास मनाई करणारे आदेश लागू करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

‘या’ गोष्टीवरही प्रशासनाकडून बंदी

गणेशोत्सव काळात गणेश मंडळे त्यांच्या स्थापनेच्या ठिकाणी ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस इ.) पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ उत्पन्न करतात किंवा हवेत सोडतात. ज्यामुळे मनुष्याचे जीवितास तसेच खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेस धोका उत्पन्न होण्याचा संभव असतो.

ADVERTISEMENT

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यात अथवा सार्वजनिक जागेत, कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळाच्या समोर कोणत्याही ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस इ.) पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. हा आदेश 10 सप्टेंबर 1 वाजेपासून ते 19 सप्टेंबरपर्यंत अंमलात असेल.

ADVERTISEMENT

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईचे देखील आदेश देण्यात आले आहेत.

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये गर्दी, Covid नियमांची ऐशीतैशी

Corona मुळे पुण्यात यंदाही गणेशोत्सव साधेपणाने

महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यातर्फे आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हे सांगण्यात आलं की यंदाही कोरोनाचं संकट संपलेलं नाही त्यामुळे उत्सव साधेपणाने साजरा करावा.

मंडप, स्पीकर यासाठी 2019 ची संमती ग्राह्य धरली जाईल. त्यासाठी मंडळांना पोलीस स्टेशन किंवा महापालिकेत यावं लागणार नाही. कोरोनाचे नियम पाळून गणेश दर्शन, कार्यक्रम, ऑनलाईन दर्शन या सगळ्याला संमती देण्यात आली आहे. पुण्यातल्या मंडळांनी एक चांगला आदर्श घालून दिला आहे यात काहीही शंका नाही.

पुण्यातल्या उत्सवाला १२५ वर्षांपेक्षा जास्त मोठी परंपरा आहे तरीही कोरोनाचं संकट आणि तिसऱ्या लाटेची भीती पाहता सगळ्या मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्यास संमती दर्शवली आहे. येणारा गणेशोत्सव हा साधेपणाने, निर्विघ्नपणे आणि योग्य ती सगळी काळजी घेऊन साजरा केला जाईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT