MCA Election : संधी मिळाली की बॅटिंग करतो… आम्हालाही कॅच पकडता येतो; पवार-शिंदेंमध्ये रंगला ‘सामना’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या (गुरूवारी) पार पडणार आहे. अध्यक्षपदासाठी पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय शिवसेना (ठाकरे गट) सचिव मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान, या मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय नेत्यांसाठी वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लब इथं स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कांँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे खजिनदार आणि भाजप आमदार आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड असे सर्वजण एकाच मंचावर आले होते.

राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र त्यावर शरद पवार यांनी खेळात राजकारण आणतं नसल्याचं स्पष्ट करत चर्चांना पूर्णविराम दिला. यासोबतच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार अशा सर्वंच नेत्यांची खुमासदार भाषण झाली. यावेळी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचा एकमेकमांमध्ये सामना रंगलेला पहायला मिळाला.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांनी?

एमसीए अध्यक्षपदासाठी गुरूवारी निवडणूक होते आहे. अशात ही निवडणूक पवार-शेलार पॅनल कशी जिंकेल यावर सगळ्यांनी लक्ष केंद्रीत करायला हवं. शिंदे पुढे म्हणाले, आम्हालाही थोडी थोडी बॅटिंग करता येते. तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली आणि मॅच जिंकली, असं म्हणत त्यांनी सत्तांतराची आठवण काढली.

तसंच जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा आम्हाला बॅटिंग करता येते, असा टोला त्यांनी मारला. एकनाथ शिंदे यांनी हे वाक्य उच्चारताच खाली बसलेले पवार म्हणाले, आम्हालासी संधी मिळाली की कॅच पकडता येतो हे लक्षात असूद्या. पवार यांच्या या हजरजबाबी उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

ADVERTISEMENT

सगळ्यांच्या आशीर्वादाने तीन महिन्यांपूर्वीची मॅच जिंकलो

आम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाने तीन महिन्यांपूर्वीची मॅच जिंकली. आम्हाला मिळालेले आशीर्वाद सगळ्यांचेच होते. काहींचे उघडपणे होते तर काहींचे मागून होते पण मनापासून होते. जेव्हा चांगलं काम होणार असतं तेव्हा त्याला शरद पवार साथ देत असते. बीकेसीच्या सभेबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं.त्यावर मी फार काही बोलणार नाही पण इतकंच सांगेन की आपल्या मनाप्रमाणे सगळं झालं. अंधेरीची निवडणूकही आपल्या सांगण्याप्रमाणे झाली.

ADVERTISEMENT

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. त्यातही सगळे एकत्र आल्यानं चर्चा आहेत. पण मी सांगू इच्छितो की, आमच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. राजकारणाचे सगळ्यांचे वेगळे विषय आहेत. आम्ही तिथं संघर्ष करु पण क्रीडा प्रकारात राजकारण बाहेर ठेवतो.

मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो तेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरात असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून मिटींगला यायचे. तसंच हिमाचलतर्फे अनुराग ठाकूर यायचे. काँग्रेसचे राजीव शुक्ला यायचे. सांगायचं कारण म्हणजे आम्ही खेळात राजकारण आणत नाही. आता भविष्यात काही प्रोजेक्ट हातात घ्यायचे आहेत. यापूर्वी बीसीसीआयचं हेड क्वार्टर आणलं. आपण बसलेलो हॉल उभा राहिला, असेही त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT