केंद्रीय अधिकारी सांगत होते काम संपलं, पण त्यांना थांबायला सांगितलं जात होतं -शरद पवार
ईडी, सीबीआय आणि एनसीबी या केंद्रीय यंत्रणांच्या वाढलेल्या कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर गंभीर आरोप केले. आयकर विभागाने अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी करण्यात आलेल्या धाडसत्रांवर पवारांनी पहिल्यांदा सविस्तरपणे भाष्य केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी ईडी, […]
ADVERTISEMENT
ईडी, सीबीआय आणि एनसीबी या केंद्रीय यंत्रणांच्या वाढलेल्या कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर गंभीर आरोप केले. आयकर विभागाने अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी करण्यात आलेल्या धाडसत्रांवर पवारांनी पहिल्यांदा सविस्तरपणे भाष्य केलं.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी ईडी, सीबीआय, आयकर, एनसीबी आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. ‘सहा महिन्यांआधी अंतराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती कमी होणे सुरु झाले, तरी केंद्र सरकारने देशात पेट्रोल-डिजल-केरोसीनच्या किंमती वाढत आहेत. यात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहेत.’
कोळसा टंचाईवरही पवारांनी भाष्य केलं. ‘3000 हजार कोटी महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारला देणे आहे. यातील 1400 कोटी देण्याची व्यवस्था कालच महाराष्ट्र सरकारने केली आहे. आता याउलट जवळपास 35000 कोटी GST चे पैसे महाराष्ट्राला केंद्राकडून येणे आहे, त्याचं काय?’, असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला.
हे वाचलं का?
माझ्या तीन बहिणींच्या कारखान्यांवर छापे का मारले? अजित पवार संतापले
‘अजित पवार यांच्या तीन बहिणींविरुद्ध आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यांचं काम दोन-तीन दिवसात पूर्ण झालं. त्यानंतरही आयकर विभागाचे अधिकारी लोक जायला तयार नव्हते. पाच दिवस ते लोक ठाण मांडून होते. मला असं वाटतं की, चौकशीसाठी आले ही चूक नाही. त्यांना वरून आदेश दिले गेले. ते लोक चौकशी पूर्ण झाली आहे, असं सांगत होते पण त्यांना थांबायला सांगितलं जात होतं. यातून यंत्रणांचा गैरवापर दिसून येतो’, असं पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
क्रूझ ड्रग्ज केस: प्लेचर पटेल आणि NCB अधिकाऱ्यांचा काय संबंध? नवाब मलिकांचा ट्विटरद्वारे आणखी एक गौप्यस्फोट
ADVERTISEMENT
‘नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. ते सातत्याने केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत असतात. केंद्र सरकारला त्यांच्याविरुद्ध काही करता येत नाही म्हणून त्यांच्या जावयांना लक्ष्य केलं गेलं. त्यांच्या जावयाला गांजा सापडल्याप्रकरणी अटक केली, पण कोर्टाने तपासणी करायला सांगितल्यानंतर तो गांजा नसल्याचं स्पष्ट झालं’, असं पवार यावेळी बोलताना म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT