शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा केला की ते सत्तेत येतात- सुप्रिया सुळे
वसंत मोरे, बारामती इंदापूर: लोकसभा निवडणूक 2024 ची रंगत आताच सुरु झाली आहे. एकाबाजूला भाजपनं राज्यात मिशन 45 चं लक्ष ठेवत 16 विविध मतदारसंघात थेट केंद्रातून मंत्री पाठवले आहेत. अशातच नुकत्याच बारामती लोकसभा मतदार संघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येऊन गेल्या. त्यांनी तीन दिवस बारामतीचा दौरा केला. आता बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापूरमध्ये सभा […]
ADVERTISEMENT

वसंत मोरे, बारामती
इंदापूर: लोकसभा निवडणूक 2024 ची रंगत आताच सुरु झाली आहे. एकाबाजूला भाजपनं राज्यात मिशन 45 चं लक्ष ठेवत 16 विविध मतदारसंघात थेट केंद्रातून मंत्री पाठवले आहेत. अशातच नुकत्याच बारामती लोकसभा मतदार संघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येऊन गेल्या. त्यांनी तीन दिवस बारामतीचा दौरा केला. आता बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापूरमध्ये सभा घेतली त्यामध्ये त्यांनी काही वक्तव्य केली आहेत.
सुप्रिया सुळे इंदापूरच्या सभेत काय म्हणाल्या?
”निवडणुकीमध्ये पडझड होत असते हे आमच्यापेक्षा कुणीही जास्त जवळून पाहिलेला नाही, कारण शरद पवार यांचे राजकारण व समाजकारण जर पाहिले तर 55 वर्षाच्या काळात जेवढे चढ आहेत तेवढेच उतार आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्षे विरोधात गेली आहेत. मी त्यांना नेहमीच सांगते, महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलेच पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला सर्वात जास्त प्रेम दिल आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. विरोधात असताना ते दौऱ्यावर निघतात पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही, काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
मी आरक्षणाच्या जागेवरून निवडणूक लढवणार नाही- सुप्रिया सुळे
”राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महिलांसाठी आरक्षण आणले. महिला उंबरठा ओलांडून निर्णय प्रक्रियेत आल्या. ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये महिला आल्या, आता आपली इच्छा आहे की, लोकसभा आणि विधानसभेमध्ये देखील महिला यायला हव्यात, राष्ट्रवादी काँग्रेसची आरक्षणाची मागणी आहेच, पण मी आरक्षणातून लढणार नाही, मी सर्वसाधारण ओपन सीटमधून लढणार आहे. मी कुठल्या तोंडाने आरक्षण मागणार आहे.