Sainath Durge : शीतल म्हात्रे प्रकरण; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अटकेत
Sheetal Mhatre Viral video case updates: माजी नगरसेविका शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या साईनाथ दुर्गे यांना दहिसर पोलिसांनी अटक केलं आहे. साईनाथ दुर्गे यांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून सोमवारी दुपारी ताब्यात घेण्यात आलं होतं. शीतल म्हात्रेंसह शिवसेनेतील नेत्यांकडून व्हिडीओ व्हायरल प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्याची […]
ADVERTISEMENT

Sheetal Mhatre Viral video case updates: माजी नगरसेविका शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या साईनाथ दुर्गे यांना दहिसर पोलिसांनी अटक केलं आहे. साईनाथ दुर्गे यांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून सोमवारी दुपारी ताब्यात घेण्यात आलं होतं. शीतल म्हात्रेंसह शिवसेनेतील नेत्यांकडून व्हिडीओ व्हायरल प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्याची मागणी होत असताना पोलिसांनी दुर्गेंना अटक केल्यानं खळबळ उडाली आहे.
शिवसेना-भाजपच्या आशीर्वाद यात्रेतील माजी नगरसेवक शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शनिवारी मध्यरात्री व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी थेट ठाकरे गटावर आरोप केले. व्हायरल झालेला व्हिडीओ मॉर्फ्ड असून, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केला होता. शनिवारी रात्री शीतल म्हात्रेंनी रितसर तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरण : आतापर्यंत पाच जण पोलिसांच्या ताब्यात
शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर दहिसर पोलिसांनी धरपकड सुरू केली. दहिसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३५४, ५०९, ५००, ३४ आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी सुरूवातीला दोन जणांना ताब्यात घेतलं. मानस कुवर (वय 26) आणि अशोक मिश्रा (वय 45) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत.
दरम्यान, रविवारीच एकाला शिवसैनिकांनी मारहाण करुन समतानगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा इसम काँग्रेसशी (Congress) संबंधित असल्याचं सांगण्यात आलं. या तिघांचीही चौकशी सुरू असताना पोलिसांनी कल्याणमधून आणखी एकाला ताब्यात घेतलं.