मुख्यमंत्रीजी, मी तुमच्या मुलीसारखी, मला मदत करा; शर्लिन चोप्राने उद्धव ठाकरेंना जोडले हात
पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि वितरण रॅकेट प्रकरणात जामीनावर सुटलेल्या राज कुंद्रावर अभिनेत्री शर्लिन चोप्राने गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी शर्लिन चोप्राने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर शर्लिन चोप्राने व्हिडीओच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडत मदत करण्याची विनंती केली आहे. शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर बलात्कार, लैगिंक शोषण, जिवे मारण्याची धमकी, […]
ADVERTISEMENT

पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि वितरण रॅकेट प्रकरणात जामीनावर सुटलेल्या राज कुंद्रावर अभिनेत्री शर्लिन चोप्राने गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी शर्लिन चोप्राने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर शर्लिन चोप्राने व्हिडीओच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडत मदत करण्याची विनंती केली आहे.
शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर बलात्कार, लैगिंक शोषण, जिवे मारण्याची धमकी, अंडरवर्ल्डची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी एप्रिलमध्ये तक्रार दिली होती. मात्र, राज कुंद्राने धमकी दिल्याने मागे घेतली, असंही शर्लिन चोप्राने म्हटलं आहे. त्याचबरोबर नव्याने तक्रार दिली असून, तातडीने जबाब नोंदवला जावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मदत करण्याची विनंती केली आहे.
शर्लिन चोप्रानं काय म्हटलंय?
‘मुख्यमंत्रीजी नमस्कार, आपला वेळ वाया न घालवता थेट मुद्द्याचं बोलते. राज कुंद्राविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी 14 ऑक्टोबर 2021 रोजी मी जुहू पोलीस ठाण्यात गेले होते. राज कु्द्राने माझी फसवणूक केल्याचं, बलात्कार केला, लैगिंक शोषण केलं. अंडरवर्ल्डची धमकी दिली, यासह विविध गोष्टी तक्रारीत नमूद केलेल्या आहेत. परंतु अद्याप मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलवलेलं नाही. माझी आपल्याला विनंती आहे की, जबाब नोंदवण्यासाठी मला बोलवलं जावं. जेणेकरून याची दखल घेतली जाऊन गुन्हा दाखल होईल आणि तपास सुरू होईल.’